जाहिरात
This Article is From Apr 09, 2024

पाडव्याच्या दिवशी संक्रात! राज्यातील 'या' सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई

पाडव्याच्या दिवशी संक्रात! राज्यातील  'या' सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई
 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्णयाचा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मुंबई:

RBI Penalty on Banks:  रिझर्व्ह बँकेनं नियम मोडणाऱ्या बँकाच्या विरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. नुकतीच पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) वरील कारवाईनंतर वेगवेगळ्या बँकांवर आरबीआयनं (RBI Action on Banks) दंड लावण्यापासून ते लायसन्स रद्द करण्यापर्यंत कारवाई केली आहे. आरबीआयनं आता राज्यातील शिरपूर मर्चंट्स को -ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

 शिरपूर मर्चंट्स को -ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती पाहून रिझर्व्ह बँकेनं त्यांच्यावर कारवाई केली आहे. या बँकेतील खात्यांमध्ये पैसे भरण्यासह (Cash Deposit) अनेक सेवांवर आरबीआयनं बंदी घातली आहे. आरबीआयच्या निर्णयानुसार या सहकारी बँकेला कोणतंही नवं कर्ज देता येणार नाही. अथवा, कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. त्याचबरोबर आरबीआयच्या परवानगीशिवाय या बँकेला त्यांच्या संपत्तीचे हस्तांतरण करता येणार नाही. 

शेअर बाजाराची रेकॉर्डतोड गुढी; पहिल्यांदाच Sensex 75,000 च्या पार, निफ्टीनेही रचला इतिहास
 

ग्राहकांना फटका

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या बँकेतील बचत (Saving Account) चालू (Current Account) खात्यासह ठेवीदाराच्या अन्य कोणत्याही खात्यामधील शिल्लक रक्कमेमधून कोणतीही रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली आहे. अर्थात या बँकेच्या ग्राहकांना आरबीआयच्या नियमानुसार आपल्या खात्यामधील जमा रकमेच्या अधारे कर्जाची परतफेड करता येईल. पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स ऑफ क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DIGCC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्याची रक्कम मिळवता येईल, असं आरबीआयनं म्हंटलं आहे.    

शिरपूर मर्चंट्स को -ऑपरेटिव्ह बँकेवर 8 एप्रिल 2024 या दिवशी कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत हे निर्बंध लागू असतील. या निर्बंधाचा अर्थ बँकेचे लायसन्स रद्द झाले आहे, असं काढू नये असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. बँकेला आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईपर्यंत बँकेचा कारभार करावा लागेल, असं आरबीआयनं सांगितलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com