जाहिरात

कसा झाला भारतीय शेअर बाजार 'आत्मनिर्भर'? वाचा बदलत्या ट्रेंडची Untold Story

Stock Market Crash : जगभरातील बाजारातल्या मंदीचे पडसाद आज (सोमवार, 5 ऑगस्ट) भारतीय मार्केटमध्येही उमटले.ल्या काही महिन्यांमधील शेअर मार्केटच्या पडझडीचा अभ्यास केला तर ही आजची घसरण ही गुंतवणूकीची संधी ठरणार आहे.

कसा झाला भारतीय शेअर बाजार 'आत्मनिर्भर'? वाचा बदलत्या ट्रेंडची Untold Story
मुंबई:

जगभरातील बाजारातल्या मंदीचे पडसाद आज (सोमवार, 5 ऑगस्ट) भारतीय मार्केटमध्येही उमटले. काही तासांंमध्ये काही तासात शेअर बाजारातील कंपन्यांची मार्केट कॅप जवळपास 15 लाख कोटींनी कमी झाली. भारतातच नाहीतर जगभरातील शेअर बाजार आज आपटले. जागतिकीकरणाच्या युगात इतर देशातील मार्केटचे पडसाद भारतीय बाजारात उमटणे हे आता नवीन राहिलेलं नाही. पण गेल्या काही महिन्यांमधील शेअर मार्केटच्या पडझडीचा अभ्यास केला तर ही आजची घसरण ही गुंतवणूकीची संधी ठरणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे ट्रेंड?

मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येऊन आता जवळपास दोन महिने उलटले आहेत. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झालं. त्यानंतरच्या दोन महिन्यात शेअर बाजारात झालेली ही तिसरी मोठी पडझड आहे. यापूर्वीच्या पडझडीमध्ये नेमकं काय झालं ते पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिनांक 4 जून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले पण भाजपकडे बहुमताचा आकडा नव्हता. शेअर बाजारात गेल्या 10 वर्षात आलेली तेजी आता संपली असं चित्र होतं. पण बाजार सावरला. 

दिनांक 23 जुलै

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला., लॉन्गटर्म कॅपिटल गेन्स टॅक्सच्या दरात बदल झाले. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 15 टक्क्यांवरुन 20 टक्के झाला. बाजार गडगड़ला. पण पुन्हा सावरला.. आणि इतका सावरला.. की निफ्टीने थेट 25 हजाराची पातळी गाठली. 

( नक्की वाचा : Market Crash : भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे, गुंतवणुकदारांचे 10 लाख कोटी उडाले; कारण काय? )

दिनांक 3 ऑगस्ट 

अमेरिकेत अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 2.8 टक्के आणि बेरोजगारीचं प्रमाण 4 टक्क्यांच्यावर नोंदवण्यात आलं. तिकडे बँक ऑफ जपानने पंधरा वर्षानंतर व्याजदरात वाढ केली. 
त्याचा परिणाम अमेरिकन आणि जपानी बाजार कोसळले. अर्थातच जागतिक पडझडीचा परिणाम भारतावर होणं क्रमप्राप्त होतं. अगदी तसंच घडलंही... सेन्सेक्स तीन हजार तर निफ्टी 1 हजार अंकांनी गडगडला

भारतामधील पडझड सर्वात कमी

गेल्या दोन दिवसात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा समोर आला.  भारतीय अर्थव्यवस्था जोखण्याच्या परिमाणात कोणताही बदल झालेला नाही. 
जागतिकीकरणाच्या चक्रात भारतीय बाजार कोसळणे आता नवं राहिलेलं नाही. पण भारतीय बाजारातील पडझड इतर बाजारांच्या तुलनेत कमीच म्हणावी लागेल

अमेरिकेचा सर्वात महत्वाचा निर्देशांक डाऊ जोन्स वायदे बाजारात 4 टक्के पडलाय अमेरिकेचा टेक कंपन्यांचा निर्देशांक शुक्रवारी नॅसडॅक 2.5 टक्के  गडगडलाय. अमेरिकाचा S&P - 1.84 टक्के पडलाय. इकडे आशियाई बाजारात जपानचा निकाई निर्देशांक  दोन 14 टक्के कोसळला आहे.
कोरियाचा कोस्पी निर्देशांक साडे 9 टक्के आपटलाय . भारतीय बाजारात दोन दिवसात निफ्टी जेमतेम 2 टक्के खाली आलाय. 

( नक्की वाचा : Gautam Adani Succession Plan: अदाणी ग्रुपमध्ये गौतम अदाणींनंतर कोण? रोडमॅप निश्चित )

10 वर्षात बदलला ट्रेंड

गेल्या दहा वर्षात भारतीयांच्या आर्थिक जाणीवा बदलल्यात. महागाईच्या दराला हरवून आपल्या गुंतणुकीवर घसघशीत परतावा मिळवण्याासाठी
शेअर बाजार हा एकमेवर उत्तम पर्याय आहे याची खात्री बहुतांश तरुण वर्गाला पटलीय. त्यामुळे पारंपारीक मुदत ठेवी, पोस्टातल्या रिकरिंगच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात SIP हे होणाऱ्या गुंतवणुकीत वेगवान उसळी दिसत आहे. 

म्युच्युअल फंडाच्या कंपन्यांची एकत्रित माहिती प्रकाशित करणारी संस्था अँफी (AMFI)ने दिलेल्या डेटानुसार  चालू आर्थिक वर्षात जून महिन्याच्या अखेरीला   62 हजार 537 कोटी रुपये SIPच्या माध्यमातून बाजरात आले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात 1 लाख 99 हजार 219 कोटी रुपये SIP ची गुंतवणूक झालीय. तर त्याआधीच्या वर्षात SIP ची ही रक्कम 1 लाख 55 हजार कोटींच्या वर होती.

आता दर महिन्याला येणारा हा पैसा जाणार कुठे? तर उत्तर एकच आहे...भारतीय शेअर बाजारात... त्यामुळेच बाजार जितक्या वेळा पडेल तितक्यांदा आपला देशांतर्गत गुंतवणूकदारचा पैसा पुढच्या काळात त्याला हातभार लावणार आहे.

पीएनजी अँड सन्सचे सीईओ अमित मोडक यांनी NDTV शी बोलताना सांगितलं की, 'शेअर बाजारातली चढउताराकडं आपण पंढरीच्या वारीत वारकरी चालतात तसं बघितलं पाहिजे.. वारकरी दोन पावलं पुढे जातात आणि एक पाऊल मागे येतात...अशीच वारी पूर्ण करुन पंढरीत पोहचतात..शेअर बाजाराचं अगदी तसचं आहे..

दोन पावलं पुढे गेल्यावर एक पाऊल मागे येणं नेहमीच चांगलं असतं. गुंतवणूकदारांनी गेल्या दोन तीन दिवसात झालेल्या पडझडीकडे अगदी अशाच पद्धतीनं पाहिलं पाहिजे.'

आत्मनिर्भर बाजार

जगात युद्ध होवो...किंवा बड्या अर्थव्यवस्थांच्या विकासाला ब्रेक लागो...आपला बाजार  आता आत्मनिर्भर झालाय. आणि आपला देशाचा गुंतवणूकदार शेअर बाजार सोडत नाही....तोवर दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी प्रत्येक पडझडही गुंतवणूकीची संधी ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com