जाहिरात

Share Market News : शेअर बाजार उघडताच धडाम; सतत नवव्या दिवशी घसरण

Share Market News : परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा दबाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरण यामुळे शेअर बाजारात सततचा दबाव आहे.

Share Market News : शेअर बाजार उघडताच धडाम; सतत नवव्या दिवशी घसरण

शेअर बाजारात सलग नवव्या दिवशी मोठ्या घसरणीची नोंद झाली आहे. शेअर बाजारातील प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी बाजार उघडताच कोसळले. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स 500 अंकांनी आणि निफ्टी 180 अंकांपेक्षा जास्त घसरला. त्यानंतर त्यात काही सुधारणा दिसून आली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास सेन्सेक्स 188.78 अंकांनी आणि निफ्टी 40.65 अंकांनी घसरला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा दबाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरण यामुळे शेअर बाजारात सततचा दबाव आहे. शेवटच्या व्यवहारात  शुक्रवारीही परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतले होते. आजही बहुतेक प्रमुख निर्देशांक लाल रंगात आहेत. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 0.69 टक्क्यांनी घसरला. तर ऑटो इंडेक्स 1.30 टक्क्यांनी घसरला आहे.

नक्की वाचा - AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर मिळणार! PM मोदींनी जगाला समजावून सांगितलं

शेअर बाजार घसरणीची कारणे?

शेअर बाजारात सद्यस्थिती परदेशी गुंतवणूकदार सातत्याने शेअर्सची विक्री करत आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील पैसा काढून घेत असल्याने बाजारावर दबाव आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली आहे. 

(नक्की वाचा- New Income Tax Bill : कसं असेल नवं कर विधेयक? तुम्हाला फायदा काय होणार? वाचा महत्त्वाची वैशिष्ट्ये)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचाही फटका गुंतवणूकदारांना बसताना दिसत आहे. मोठे गुंतवणूदार म्हणजे HNIs कडून सतत विक्री सुरुच आहे. अनेक छोटे गुंतवणूक तोट्यात शेअरची विक्री करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: