जाहिरात

Stock Market Today: शेयर बाजाराचा नवा रेकॉर्ड; Sensex शिखरावर, तर Nifty पहिल्यांदा 23,500 पार

Stock Market Today 18 June 2024: शेअर बाजारातील तेजी केवळ निर्देशांकांपुरती मर्यादित आहे असं नाही. संरक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली.

Stock Market Today: शेयर बाजाराचा नवा रेकॉर्ड; Sensex शिखरावर, तर Nifty पहिल्यांदा 23,500 पार
Stock Market Updates: आज ज्यादातर सेक्टरल इंडेक्स हरे निशान में खुले हैं.

निनादा झारे, मुंबई

Stock Market Updates: लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जोरदार आपटलेला शेअर बाजार आता तोट्यातून पूर्णपणे सावरला आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्सने सलग तिसऱ्यांदा 
नवे उच्चांक नोंदवले आहेत. दिवसअखेर निफ्टी आतापर्यंतच्या 23557 च्या  सर्वोच्च पातळीवर बंद झाला. तर  सेन्सेक्सनेही दिवसाच्या सुरुवातीला 77 हजारांच्यावर गेल्यावर दिवसभर खरेदीचं सत्र सुरुच राहिलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिवसअखेर सेन्सेक्स 77 हजार 301 वर बंद झाला. खासगी बँका, रिअल इस्टेट कंपना, वीज निर्मिती आणि सरकारी कंपन्यांमध्ये गेल्या काही दिवसात आलेली तेजी आजही कायम होती. विशेष म्हणजे आज सलग नवव्या दिवशी शेअर बाजार तेजीत बंद झाला आहे. 

(नक्की वाचा- शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? मग ही बातमी नक्की वाचा)

HAL ने टाटा मोटर्सला टाकलं मागे

शेअर बाजारातील तेजी केवळ निर्देशांकांपुरती मर्यादित आहे असं नाही. संरक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली. हिदुस्थान एअरोनिट्स लि. (HAL) या लढाऊ विमानं बवणाऱ्या सरकारी कंपनीच्या बाजारमूल्याने आज टाटा मोटर्सच्या बाजारमूल्याला मागे टाकलं. 

त्याचप्रमाणे कोचिन शिपयार्ड, माझगाव डॉक सारख्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्याचे शेअर्स सध्या तूफान तेजीत आहेत. अदाणी एन्टरप्राझेस, अदाणी पोर्ट्स सारख्या अदाणी समूहाच्या शेअर्समध्येही तेजी आज कायम राहिली. तिकडे व्होडाफोन आयडीयाच्या शेअरमधील तेजीनंतर आज टेलिकॉम क्षेत्रातली दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलच्या समभागातही दमदार खरेदी दिसली.

(नक्की वाचा- ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?)

निफ्टीचे टॉप गेनर्स

निफ्टीच्या टॉप गेनर्स शेयर्समध्ये अदाणी एंटरप्राइजेज, अदाणी पोर्ट्स, एमएंडएम, विप्रो, आणि ओएनजीसी या शेअर्सचा समावेश आहे. तर मारुति सुजुकी, टीसीएस, डिविस लॅब्स, डॉ रेड्डीज लॅब्स आणि एचडीएफसी लाइफ टॉप लूजर्स ठरले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम
Stock Market Today: शेयर बाजाराचा नवा रेकॉर्ड; Sensex शिखरावर, तर Nifty पहिल्यांदा 23,500 पार
abhishek-bachchan-buys-6-luxury-apartments-in-whopping-price-at-mumbai
Next Article
अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का