Share Market News : शेअर बाजारात सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. 2021 नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी तेजी पाहायला मिळाली. कालच्या तेजीनंतर आज बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सपाट सुरुवातीनंतर शेअर बाजार कोसळला. काही वेळातच शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली आला. तर निफ्टी 300 अंकानी खाली आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुपारी 1 वाजता सेन्सेक्स 1253 अंकांच्या घसरणीसह 1.52 टक्क्यांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी 316 अंकांच्या घसरणीसह 1.27 टक्क्यांवर ट्रेड करत होता. काल सर्वाधिक वधारलेल इन्फोसिस आणि टाटा स्टील शेअर आज जोरदार कोसळले.
(नक्की वाचा- Mobile App : हे 5 सरकारी अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)
सकाळी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये सेन्सेक्स 124.47 अंकांनी वाढून 82554.37 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी 41.55 अंकांनी वाढून 24966.25 वर व्यवहार करत होता. मात्र बाजारात नफा वसुली झाल्यानंतर घसरणीला सुरुवात झाली.
(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
सोमवारी 16 लाख कोटी वाढले
सोमवारी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आणि त्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स 2975 अंकांनी वाढून 82,429.90 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 916.70 अंकांनी वाढून 24,924.70 अंकांवर बंद झाला होता. या तेजीमुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली.