Union Budget 2025: देशाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडला. विशेष म्हणजे निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा देशाचे बजेट मांडण्याची कामगिरीही केली आहे. संपूर्ण देशाचं बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची संपत्ती किती? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.. जाणून घ्या निर्मला सीतारमण यांच्याबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी:
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निर्मला सीतारमण या एक प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी झाला. त्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्या आहेत आणि 2019 पासून भारत सरकारच्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत.
सीतारमण यांनी विल्लुपुरम येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमधून आपले शिक्षण सुरू केले आणि नंतर चेन्नईतील विद्यादय स्कूल आणि तिरुचिरापल्ली येथील सेंट फिलोमेना आणि होली क्रॉस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतलक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि एम.फिलचे शिक्षण पूर्ण केले.
( नक्की वाचा : Union Budget 2025 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त )
निर्मला सीतारमण यांची संपत्ती अन् पगार किती?
2022 मध्ये राज्यसभेच्या उमेदवारी अर्जादरम्यान निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र (लेखी विधान) दिले होते. ज्यामध्ये त्यांच्याकडे 63 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1 कोटी 87 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता अशी एकूण संपत्ती 2.5 कोटी रुपये संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामध्ये त्यांनी 26.91 लाखांचे कर्ज असल्याचाही उल्लेख केला होता.
याशिवाय निर्मला सीतारमण यांच्याकडे बजाज चेतक स्कूटर आहे, ज्याची किंमत 28,200 रुपये आहे. त्यांच्याकडे सुमारे 315 ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत 19.4 लाख ते 21.18 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे 3.98 लाख रुपयांची चांदी देखील आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्यांचा मासिक पगार सुमारे 1 लाख रुपये आहे. याशिवाय, त्यांना विविध भत्त्यांच्या स्वरूपात 4 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world