जाहिरात

Gold Silver Price : सोन्या-चांदींच्या दरात एकाच दिवसात विक्रमी वाढ; युद्धाच्या पार्श्वभूमीवर दरात मोठी उसळी

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरात मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

Gold Silver Price : सोन्या-चांदींच्या दरात एकाच दिवसात विक्रमी वाढ; युद्धाच्या पार्श्वभूमीवर दरात मोठी उसळी

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Gold Silver Price : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून इस्रायलने इराणमध्ये मोठा हल्ला केला आहे. तेहरानसह अनेक इराणी शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशभरात तत्काळ राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरात मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात 7 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अमेरिका व इराण इजराइल युद्धाच्या परिणामामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे. 

अमेरिका व इराण इजराइल युद्धाचा परिणाम हा सोन्या-चांदीच्या भावावर पाहायला मिळत असून एका दिवसात सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दारात 7 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची वाढ झाली असून जीएसटीविना सोन्याचे दर 1 लाख 67 हजार रुपयांवर तर जीएसटी सह सोन्याचे दर 1 लाख 72 हजार 100 रुपयांवर पोहोचले आहे. तर जीएसटी विना चांदीचे दर 2 लाख 90 हजार रुपयांवर व जीएसटी सह चांदीचे दर 2 लाख 98 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहे. 

नक्की वाचा - Gold Rate: सोन्याचे दर लवकरच 1 लाखांच्या खाली येणार? काय आहे कारण?

जागतिक अशांततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोना व चांदीच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात असल्याने मोठ्या प्रमाणात सोन व चांदीची गुंतवणूक होत असून याचाच परिणाम सोन्या चांदीच्या दरवाढीवर झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com