Gold Rate Today : दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. जगभरात हाच ट्रेंड आहे आणि जागतिक सराफा बाजारात सोन्याची किंमत दिवसागणिक कमी होत आहे. 18 ऑक्टोबर धनत्रयोदशी ते 30 ऑक्टोबरपर्यंत सोन्याच्या किमती पाहिल्या तर 10,370 रुपयांचं अंतर आहे. पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतीत 5 ते 10 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
24 कॅरेट सोन्याबद्दल सांगायचं झालं तर सोन्याची किंमत 18 ऑक्टोबरला 1,32,780 प्रति तोळ्यापर्यंत आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 99,590 प्रति तोळा झाली आहे. 30 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याची किमत 1,22,410 प्रति तोळं, 22 कॅरेट सोन्याची किमत 1,12,210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेटचा रेट 91,810 रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचली आहे. कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लाभ वसुलीचा काळ दिसत आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीच्या किमती कमी आहेत. 30 ऑक्टोबरला चांदीचे रेट एक लाख 62 हजार रुपये प्रति किलोग्रॅम आहे. तर १८ ऑक्टोबरला हा भाव 1 लाख 57 हजार 300 रुपये होता.
सोन्याच्या भावाच्या घसरणीची मोठी कारणं...
1 ट्रम्प आणि जिनपिंगच्या भेटीदरम्यान अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड हिल होण्याची शक्यता.
2 सुरक्षित गुंतवणुकीसाठी डॉलर मजबूत होत आहे.
3 भारत, कोरिया आणि इतर देशांसोबतच्या व्यापार करारांबद्दल अमेरिका सकारात्मक.
4 या वर्षी सोन्याच्या किमतीत ५०% वाढ झाल्यामुळे गुंतवणुकदारांची नफेसाठी वाटचाल.
5 यूएस फेडरल रिझर्व्हनंतर जपान आणि युरोपियन सेंट्रल बँक देखील व्याजदरात कपात करू शकतात.
6 सणासुदीचा हंगाम संपला. त्यामुळे सोन्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ झाली आहे.
7 सोन्याची किंमत कमी असताना गुंतवणूक करणारे आता विक्री करीत आहेत.
8 अमेरिकेतील व्याजदर कमी झाल्यामुळे, मोठे गुंतवणूकदार बाँडकडे वळू पाहत आहेत.
9 सोने खरेदी करण्यासाठी मध्यवर्ती बँकांची गर्दी देखील स्थिर होत आहे.
10 लग्नाचा हंगाम २ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, परंतु ज्यांना दागिने खरेदी करायचे आहेत त्यांनी आधीच ते खरेदी केले असावेत.

Gold Silver
सोने-चांदीच्या किमती
मुंबईत सोन्याचे भाव
24 कॅरेट- 120490
22 कॅरेट-110450
18 कॅरेट- 90370
(प्रति तोळा)
कोलकातात सोन्याचे भाव भाव
24 कॅरेट- 120490
22 कॅरेट-110450
18 कॅरेट- 90370
(रुपये प्रति तोळा)
चेन्नईमध्ये सोन्याचे भाव
24 कॅरेट- 121090
22 कॅरेट-111000
18 कॅरेट- 92600
(प्रति तोळा)
पाटन्यात सोन्याचे भाव
24 कॅरेट- 120540
22 कॅरेट-110500
18 कॅरेट- 90420
(रुपये प्रति तोळा)
लखनऊमध्ये सोन्याचे भाव
24 कॅरेट- 120640
22 कॅरेट-110600
18 कॅरेट- 90520
( रुपये प्रति तोळा , स्रोत- गुड रिटर्न्स)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world