![UP Accident : प्रयागराजमध्ये कार आणि बसमध्ये भीषण अपघात, कुंभमेळ्याला निघालेल्या 10 भाविकांचा मृत्यू UP Accident : प्रयागराजमध्ये कार आणि बसमध्ये भीषण अपघात, कुंभमेळ्याला निघालेल्या 10 भाविकांचा मृत्यू](https://c.ndtvimg.com/2023-12/s625qv4o_accident-generic-_625x300_16_December_23.jpg?downsize=773:435)
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कुंभमेळ्याला निघालेल्या 10 भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बोलेरो कार आणि बसमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)
बस मध्यप्रदेशची होती आणि बोलेरो गाडी छत्तीसगडची असल्याचे सांगितले जात आहे. बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व लोक छत्तीसगडचे रहिवासी होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक संगममध्ये स्नान करण्यासाठी येत होते.
(नक्की वाचा- रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का?)
प्रयागराजमधील या अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world