‘अदाणी मंगल सेवा' ही दिवा आणि जीत अदाणी यांनी त्यांच्या विवाहसोहळ्याला सामाजिक बांधिलकीचे रूप देण्याच्या निर्णयाचे प्रतीक आहे.पहिल्याच वर्षात या उपक्रमाअंतर्गत ५०० दिव्यांग महिलांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मुदत ठेव देण्याचे वचन पूर्ण करण्यात आले असून यामुळे त्यांना मासिक उत्पन्नासह दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळाली आहे.गौतम अदाणी यांच्या ‘सेवा ही साधना आहे' या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन आणि अदाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारी ‘अदाणी मंगल सेवा' ही सन्मान, सातत्य आणि सक्षमीकरण यांना केंद्रस्थानी ठेवणारी एक अर्थपूर्ण सामाजिक चळवळ ठरत आहे.
गुरुवारी संध्याकाळी शांतिग्राम येथील बेल्व्हेडिअर क्लबच्या लॉनवर सामाजिक सेवेचा एक भावस्पर्शी क्षण साजरा करण्यात आला.‘अदाणी मंगल सेवा' उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा सोहळा होता.७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या विवाहाआधी दिवा आणि जीत अदाणी यांनी वैयक्तिक आनंदाला समाजसेवेचा सेवेची जोड देण्याचा निर्णय या प्रसंगी पुन्हा अधोरेखित झाला. हा केवळ स्मरणोत्सव नव्हता,तर दिलेले वचन पूर्णत्वास गेल्याची साक्ष होती.
वैयक्तिक संकल्पातून सुरू झालेला हा उपक्रम आज एक संरचित सामाजिक सुरक्षा कार्यक्रम बनला असून दरवर्षी ५०० दिव्यांग महिलांना सन्मान, स्थैर्य आणि भविष्यासाठी आश्वासन देत आहे. अदाणी समूहाची सामाजिक कल्याण व विकास शाखा असलेल्या अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘अदाणी मंगल सेवा'अंतर्गत २५ ते ४० वयोगटातील दिव्यांग महिलांची निवड करण्यात येते. या महिला ‘यूथ फॉर जॉब्स' या प्रकल्प भागीदार संस्थेमार्फत यांची निवड केली जाते आणि त्यांच्याकडे युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड असणे आवश्यक आहे.
नक्की वाचा >> NDTV Profit Conclave 2026 अमेरिकेसोबतचा ऐतिहासिक करार अन् भारताचा नवा 'प्लॅन'NDTV च्या व्यासपीठावर होणार मंथन
दरवर्षी ५०० दिव्यांग महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेस स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकिंग भागीदाराच्या सहकार्याने १० लाख रुपयांची मुदत ठेव दिली जाते. या रचनेमुळे दरमहा निश्चित उत्पन्न मिळते, तसेच १० वर्षांनंतर मूळ रक्कम उपलब्ध होते. ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.हा उपक्रम किमान पाच वर्षांसाठी आखण्यात आला असून, दरवर्षी ५०० दिव्यांग महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून या उपक्रमाचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम राहील.
‘अदाणी मंगल सेवा'मागील प्रेरणा अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या ‘सेवा ही साधना आहे' या विचारातून मिळते.सेवा ही सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने केली पाहिजे, केवळ प्रतीकात्मक नसावी.या वैयक्तिक तत्त्वज्ञानामुळे हा उपक्रम आकाराला आला आणि एका कौटुंबिक आनंदाला दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचे रूप मिळाले. हा कार्यक्रम शांततेत आणि आपुलकीच्या भावनेत पार पडला.लाभार्थी महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वयंसेवकांच्या मदतीने कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि आत्मचिंतनाने झाली.त्यानंतर सादरीकरणातून ‘अदाणी मंगल सेवा'चा मुख्य विश्वास पुन्हा अधोरेखित करण्यात आला.समृद्धीला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो, जेव्हा ती इतरांसाठी शाश्वत संधी निर्माण करते.यावेळी महिलांना मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.अहमदाबाद येथील ब्लाइंड पीपल्स असोसिएशनच्या कलाकारांनी सादर केलेले गरबा आणि फ्युजन संगीत कार्यक्रम देखील सादर केला.
गौतम अदाणी ‘एक्स'वर काय म्हणाले?
“आज जीत आणि दिवा त्यांच्या वैवाहिक आयुष्याचे एक वर्ष पूर्ण करत आहेत. या आनंदाच्या प्रसंगी त्यांना माझा मनःपूर्वक आशीर्वाद आणि शुभेच्छा. याच दिवशी मागील वर्षी त्यांनी मंगल सेवेचा संकल्प केला होता. दरवर्षी ५०० नवविवाहित दिव्यांग मुलींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय होता. ही प्रतिज्ञा त्याच प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि जबाबदारीने पुढे चालू असल्याचे पाहून एक आनंद वाटतो. या उपक्रमाने अनेक कुटुंबांना मायेचा स्पर्श केला आहे. केवळ आर्थिक सुरक्षितता नव्हे, तर सन्मान आणि आशेने पुढे पाहण्याचे धैर्य दिले आहे. एखाद्या मुलीच्या आयुष्यात पुन्हा हास्य आणि आत्मविश्वास परतताना पाहण्याचा आनंद इतका अधिक असतो की जगातील सर्वात मोठे यश आणि भौतिक संपत्तीही त्यापुढे क्षुल्लक वाटतात.
एक पिता म्हणून मला अभिमान वाटतो की माझी मुले स्वतःचा आनंद अनेक कुटुंबांच्या आयुष्यात पोहोचवत आहेत. जिथे गरज आहे तिथे आशा, दिलासा आणि आनंद देत आहेत. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की सेवेची ही भावना असंख्य जीवनांमध्ये आनंद, सन्मान आणि नव्याने आशा निर्माण करत राहो आणि जीत व दिवा हे करुणा, उद्देश आणि सेवेच्या या मार्गावर अढळ राहोत.”
कार्यक्रमाला संबोधित करताना अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी म्हणाल्या,“आजचा हा कार्यक्रम अत्यंत भावस्पर्शी असून माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण येथे केवळ एका कार्यक्रमासाठी नव्हे, तर मानवी सन्मान, आशा, स्वप्ने आणि सक्षमीकरण यांचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत. अदाणी मंगल सेवेची प्रेरणा एका साध्या पण महत्वाच्या विचारातून जन्माला आली. वैयक्तिक आनंदाचा सर्वोच्च अर्थ तो सामूहिक कल्याणासाठी केलेल्या कार्यातूनच मिळतो. आयुष्यात आनंदाचे क्षण मिळाले की तो आनंद समाजापर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे. म्हणूनच अदाणी मंगल सेवा माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक आहे. हा केवळ कार्यक्रम नाही. ही एक भावना आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये अपार सामर्थ्य असते, हा विश्वास आहे. दिव्यांग असणे ही मर्यादा नाही; तर जीवनाकडे जिद्द, धैर्य आणि वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची ताकद आहे. येथे उपस्थित असलेली प्रत्येक भगिनी त्या सामर्थ्याची जिवंत साक्ष आहे.”
याआधी बोलताना जीत अदाणी म्हणाले,“मंगल सेवेने आम्हाला शिकवले की कधी कधी सर्वात मोठा आधार तो असतो, जो कोणालातरी खंबीर पाठिंबा देत असतो. ज्यामध्ये स्थिर, विश्वासार्ह आणि सन्मान असतो. आमच्यासाठी हा एखादी गोष्ट पूर्ण करून पुढे जाण्याचा विषय नाही. ही एक जबाबदारी आहे, जी आम्ही पुढे नेत राहणार आहोत.”
दिवा अदाणी म्हणाल्या,“अदाणी मंगल सेवा ही विश्वासावर उभी आहे. सुरक्षितता टिकून राहिली पाहिजे, आणि सन्मान कधीही परिस्थितीवर अवलंबून नसावा.”कार्यक्रमादरम्यान गौतम अदाणी यांच्या हस्ते ‘अदाणी मंगल सेवा' या परिवर्तनाच्या कथा सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भोजनाने झाला. पहिले वर्ष पूर्ण करताना ‘अदाणी मंगल सेवा' हा उपक्रम हेच दर्शवतो की जेव्हा मदत करण्याचा उद्देश मोठा असतो तेव्हा काम करण्याची अधिक उर्मी मिळते. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील मोठ्या सेवा उपक्रमांपासून ते गेल्या वर्षी पुरी येथील रथयात्रेदरम्यान भाविकांना दिलेल्या सहकार्यापर्यंत, मूळ तत्त्व एकच राहिले आहे, खरी समृद्धी सेवेपासून वेगळी असू शकत नाही, आणि सन्मान, हेतू व सातत्याने केली जाणारी सेवा ही स्वतःमध्येच एक साधना ठरते.
अदाणी फाउंडेशन विषयी
१९९६ पासून अदाणी समूहाची सामाजिक कल्याण व विकास शाखा असलेली अदाणी फाउंडेशन ही भारतभर शाश्वत परिणाम साधणाऱ्या धोरणात्मक सामाजिक गुंतवणुकीसाठी सतत कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य व पोषण, शाश्वत उपजीविका, हवामान कृती आणि समुदाय विकास या प्रमुख क्षेत्रांमध्ये बालक, महिला, युवक आणि वंचित घटकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध आहे. फाउंडेशनचे कार्यक्रम राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांशी संलग्न आहेत. सध्या अदाणी फाउंडेशन २२ राज्यांतील ७,०७१ गावांमध्ये कार्यरत असून ९.६ दशलक्ष (९६ लाख) लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world