जाहिरात

Adani Group: ग्रामीण आरोग्य सेवेला अदाणी समुहाचा बूस्टर, बिहारमध्ये 'अखंड ज्योती आय केअर' रुग्णालयाचे उद्घाटन

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रीती अदाणी यांच्यासोबत बिहारच्या सारन जिल्ह्यातील मस्तिचक येथे 'अदाणी अखंड ज्योती आय केअर' रुग्णालयाचे उद्घाटन केले.

Adani Group: ग्रामीण आरोग्य सेवेला अदाणी समुहाचा बूस्टर, बिहारमध्ये 'अखंड ज्योती आय केअर' रुग्णालयाचे उद्घाटन
Gautam Adani Latest News

Eye Hospital In Bihar : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रीती अदाणी यांच्यासोबत बिहारच्या सारन जिल्ह्यातील मस्तिचक येथे 'अदाणी अखंड ज्योती आय केअर' रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या 'अदाणी अखंड ज्योती आय केअर' रुग्णालयाचे भूमीपूजन केले. अदाणी फाउंडेशन आणि 'अखंड ज्योती आय हॉस्पिटल' यांच्या सहकार्याने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. या रुग्णालयाच्या माध्यमातून अंधत्वावर प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसच दुर्लक्षित घटकांना परवडेल, अशाप्रकारची उत्तम नेत्रसेवाही देण्यात येणार आहे. अदाणी समुहाच्या माध्यमातून सुरु केलेल्या या उपक्रमाचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. रुग्णालयाच्या उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. 

हे नवं रुग्णालय मस्तिचक येथे उभारण्यात आले आहे. बिहारमधील नेत्ररोग उपचारांसाठी दर्जेदार केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना याद्वारे आखण्यात आली आहे. अदाणी समूहाचा ‘अदाणी आय केअर प्रकल्प' हा अखंड ज्योती आय हॉस्पिटल आणि अदाणी फाउंडेशन यांचा हा ऐतिहासिक संयुक्त उपक्रम आहे.याच्या अंतर्गत ‘अदाणी सेंटर फॉर आय डिसीजेस' आणि ‘अदाणी ट्रेनिंग सेंटर फॉर ऑप्थाल्मिक सायन्सेस' चालवण्यात येणार आहेत.

13,59,000 पेक्षा अधिक रुग्णांना सेवा देणार

अखंड ज्योतीने उच्च प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या शस्त्रक्रियांवर आधारित भक्कम वारसा उभारला आहे. प्रादेशिक आरोग्य सेवा पुरवठ्यात या नेटवर्कने मोठ्या प्रमाणावर त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. 5 विशेष रुग्णालये, 49 हून अधिक प्रादेशिक डोळ्यांचे दवाखाने आणि 880 पेक्षा अधिक बेड्सची मजबूत पायाभूत सुविधा रुग्णांना देण्यात येते.विशेष म्हणजे,सध्याच्या घडीला हे नेटवर्क  13,59,000 पेक्षा अधिक रुग्णांना सेवा देत आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून रुग्णांना समाधानकारण सेवा दिली गेलीय. 

नक्की वाचा >> Pune News: पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत..इंदापूरच्या ओंकारने सायकलवरून चक्क केदारनाथ गाठलं, थक्क करणारा Video

दरवर्षी 1,45,000 हून अधिक दृष्टी पुनर्स्थापित करणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. विशेषतः मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) शस्त्रक्रियांसाठी ही संस्था या विभागातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. यामागे वरिष्ठ नेत्रतज्ज्ञांचे मोठे योगदान आहे,ज्यांनी वैयक्तिकरित्या 20,000 हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.तसच त्यांना या कामाचा दांडगा अनुभवही आहे.

अंधत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार 

नव्याने सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प उत्तर व मध्य भारतातील वंचित घटकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा आणि क्षमतावर्धनाच्या मजबूत पायाभूत सुविधांचा समन्वय साधून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या माध्यमातून परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात सेवा देण्यात येणार आहे. मोतीबिंदू,ग्लॉकोमा यांसारख्या आजारांसह प्रगत रेटिनल आणि बालरोग, डोळ्यांच्या आजारापर्यंत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान मोफत किंवा अत्यल्प खर्चात उपलब्ध करून दिले जाईल.

नक्की वाचा >> Viral Video: वृद्धाने 'त्या' मेट्रो स्टेशनवर महिलेसमोरच केला घाणेरडा प्रकार,म्हणाला, "तुला जे करायचे ते कर.."

‘अंधत्व निर्मूलन कार्यक्रम'अंतर्गत पुनर्स्थापित केलेली प्रत्येक दृष्टी बिहारसारख्या दुर्लक्षित भागांमध्ये सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक प्रगतीस चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे.अदाणी समूहाच्या सहकार्याने,हे नेटवर्क जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त ‘फुटबॉल टू आयबॉल' या मुलींच्या सक्षमीकरण कार्यक्रमाचा विस्तार करत आहे.हा अभिनव उपक्रम ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठीही आहे. खेळांच्या माध्यमातून नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित केली जाते. तसच त्यांना उच्च दर्जाचं तांत्रिक शिक्षण दिले जाते.अखंड ज्योती आणि अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अंधत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com