जाहिरात

Gautam Adani: गौतम अदाणींविरोधातील अमेरिकेतील खटले बंद होणार! लवकरच अधिकृत घोषणा शक्य

अदाणी समूहाने हे सर्व आरोप सुरुवातीपासूनच फेटाळून लावले आहेत.

Gautam Adani: गौतम अदाणींविरोधातील अमेरिकेतील खटले बंद होणार! लवकरच अधिकृत घोषणा शक्य

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेत अदाणी यांच्यावर करण्यात आलेले आरोप लवकरच मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकारी हा खटला निकाली काढण्यासाठी आणि फौजदारी गुन्हे मागे घेण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कायदेशीर वादावर पडदा पडू शकतो.

ब्रुकलिन येथील अमेरिकन अटॉर्नी कार्यालयाने गौतम अदाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतात सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिकन गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करताना ही बाब लपवून ठेवल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. मात्र, अदाणी समूहाने हे सर्व आरोप सुरुवातीपासूनच फेटाळून लावले आहेत.

नक्की वाचा - HSRP number plates: 'HSRP'नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास...

ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार, अमेरिकेचा न्याय विभाग याच आठवड्यात आरोप मागे घेण्याची घोषणा करू शकतो. त्याचबरोबर, 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन' (SEC) देखील नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालेला दिवाणी फसवणुकीचा खटला निकाली काढण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेत खटला संपवण्यासाठी काही प्रमाणात दंडाची तरतूद केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

नक्की वाचा - Sharad Pawar: 'मोदींच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा पण...' शरद पवारांनी टाकली गुगली, केली मोठी मागणी

अदाणी समूहावरील हे कायदेशीर संकट दूर झाल्यास समूहासाठी जागतिक भांडवली बाजार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने खुला होईल. यामुळे समूहाला आपल्या विस्तार योजनांसाठी आक्रमक रणनीती आखण्यास मदत मिळेल. सध्या या प्रकरणावर अमेरिकन अटॉर्नी ऑफिस किंवा अदाणी समूहाच्या प्रवक्त्यांनी अधिकृत टिप्पणी केलेली नाही, मात्र वकिलांनी न्यायालयात हा खटला फेटाळण्याची मागणी आधीच केली आहे.


 

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com