जाहिरात

Eknath Shinde Fake OSD: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोतया OSD पुण्यात गजाआड;थेट पोलीस उपायुक्तांवरच आणला दबाव

Eknath Shinde Fake OSD: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा OSD असल्याचे सांगणाऱ्या तोतया व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. जाणून घ्या या प्रकरणाचा सविस्तर तपशील.

Eknath Shinde Fake OSD: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोतया OSD पुण्यात गजाआड;थेट पोलीस उपायुक्तांवरच आणला दबाव
"Eknath Shinde Fake OSD: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोतया OSD अटकेत"

Eknath Shinde Fake OSD: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) असल्याची बतावणी करणाऱ्याला तोतया व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाचा ओएसडी असल्याचे सांगून या आरोपीने पुणे पोलीस उपायुक्तांची दिशाभूल करण्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात पोहोचून आरोपीने स्वतःची ओळख उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून करून दिली आणि एका प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झाला नसल्याचे सांगितले. 

पोलीस उपायुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीची ओळख प्रद्युम्न श्रीहरी पाटील अशी झाली आहे. हा 47 वर्षीय व्यक्ती हिंजवडी येथील रहिवासी आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी सांगून डीसीपींना धमकी दिली होती, पण चौकशीत उपमुख्यमंत्री कार्यालयात या नावाचा कोणताही ओएसडी नसल्याचे स्पष्ट झाले.

उपायुक्तांच्या कार्यालयात शिरून दबाव टाकण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रद्युम्न पाटील पुण्यातील परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात गेला होता. तिथे त्याने आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी असल्याचे भासवले. एका विशिष्ट प्रकरणाच्या तपासाबाबत त्याने अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

(नक्की वाचा: Pune Crime: आणखी एक 'कॅप्टन खरात' सापडला! दोष दूर करण्यासाठी संबंध, खेडमधील 'गवळी'बाबाचे भयंकर कृत्य)

खुद को डिप्टी सीएम एकनाथ शिंदे का ओएसडी बताने वाला प्रद्युम्न श्रीहरि

प्रद्युम्न श्रीहरी पाटील

संशय आल्याने डीसीपींनी केली खातरजमा

याबाबत माहिती देताना डीसीपी ऋषिकेश रावले यांनी सांगितले की, प्रद्युम्न पाटील याच्या वागण्यावर संशय आला. त्यांनी तातडीने उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून या व्यक्तीबाबत माहिती मिळवली. तपासात असे समोर आले की, प्रद्युम्न पाटील नावाचा कोणताही व्यक्ती उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी नाही आणि समोर उभा असलेला व्यक्ती तोतया असून फसवणूक करत आहे. काही दिवसांपूर्वीच जळगावमध्येही उपमुख्यमंत्र्यांच्या एका तोतया स्वीय सहायकाला (PA) अटक करण्यात आली होती. हितेश रमेश संघवी आणि अर्पिता संघवी अशी या आरोपींची नावे होती. त्यांनी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ओळखपत्रे, लेटरहेड आणि नियुक्ती पत्रे देखील तयार केली होती. 

(नक्की वाचा: Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)

तोतया ओएसडीचे सत्य समोर येताच पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी प्रद्युम्न पाटील याला तत्काळ अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 204 (फसवणुकीसाठी बनावट ओळख वापरणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक कायदेशीर तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com