
Delhi Crime News : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या तरुणाची चांगलीच जिरली आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला कुंटंबातील सदस्य आणि गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. त्याआधी हा प्रियकर मोठ्या पेटीत लपून बसला होता. आग्रा येथील फतेहाबाद येथे ही घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहीत महिला कुटुंबियांसह घराच्या गच्चीवर झोपली होती. दरम्यान मध्यरात्री महिलेने फोन करुन शेजारील गावात राहणाऱ्या आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. त्यानंतर दोघे एका खोलीत गेले. त्याचवेळी महिलेचा नवरा रात्री उठून खाली आला तेव्हा त्याला खोलीतून पुरुषाचा आवाज येत होता. त्याला संशय आल्याने त्यांने घरातील सदस्यांना आणि शेजाऱ्यांना एकत्र केले.
(नक्की वाचा- Zeeshan Siddiqui : 'जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू'; बाबा सिद्दीकींचा मुलगा टार्गेटवर, कुणी दिली धमकी?)
खोलीचा दरवाजा ठोठावला. अचानक सगळं घडल्याने महिलेने घाईगडबडीत प्रियकराला एका मोठ्या पेटीत म्हणजे ट्रंकमध्ये लपवलं आणि दरवाजा उघडला. त्यानंतर घरच्यांनी आणि गावकऱ्यांना संपूर्ण खोलीत शोध घेतला. मात्र कुणीही तिथे सापडलं नाही. मात्र पेटी उघडली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. पेटीत महिलेने तिच्या प्रियकराल लपवून ठेवलं होतं.
महिलेचा प्रियकर अर्धनग्न अवस्थेत ट्रंकमध्ये लपला होता. त्याला पाहताच कुटुंबातील लोक संतापले आणि त्यांनी प्रियकराला बेदम चोप दिला. मारहाण केल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि त्याला पोलिसांकडे देण्यात आलं.
(नक्की वाचा- Big news: 'ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं' भाजपचे मंत्री कुणावर भडकले?)
पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. महिलेच्या प्रियकराने सांगितले की मागील वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. तो अनेकदा त्या महिलेच्या पतीच्या अनुपस्थितीत तिला भेटायला जात असे. तक्रारीनंतर पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world