जाहिरात

Ahmedabad plane crash : विमानात तांत्रिक किंवा देखभालीसंदर्भात त्रुटी नव्हती, एअर इंडियाचे CEO काय म्हणाले?

अहमदाबाद एअर इंडिया विमान (Ahmedabad Air India Flight) अपघाताबाबत AAIB च्या प्राथमिक अहवालावर एअरलाइन कंपनीचे सीईओ आणि एमडी कँपबेल विल्सन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ahmedabad plane crash : विमानात तांत्रिक किंवा देखभालीसंदर्भात त्रुटी नव्हती, एअर इंडियाचे CEO काय म्हणाले?

अहमदाबाद एअर इंडिया विमान (Ahmedabad Air India Flight) अपघाताबाबत AAIB च्या प्राथमिक अहवालावर एअर इंडिया कंपनीचे सीईओ आणि एमडी कँपबेल विल्सन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितलं की, या अहवालात दुर्घटनाग्रस्त एअर इंडियाच्या  विमानात (AI171) कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा देखभाल संबंधित त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. (AAIB's preliminary report) 

ते पुढे म्हणाले, विमान किंवा विमानातील इंजिनमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. सर्व आवश्यक देखभालीचे कार्य पूर्ण करण्यात आले होते. इंधनाच्या गुणवत्तेबद्दलही कोणतीही कमतरता नव्हती. टेकऑफ रोलमध्ये कोणतीही असामान्यता आढळली नाही. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांची अल्कोहोल  चाचणी करण्यात आली होती आणि त्यांच्यापैकी कोणीच अल्कोहोल घेतलं नव्हतं. 

Ahmedabad Plane Crash : ‘मेडे मेडे..' म्हणण्यापूर्वी काय घडलं? Aviation Expert रोहित चंदावरकरांची महत्त्वपूर्ण माहिती

नक्की वाचा - Ahmedabad Plane Crash : ‘मेडे मेडे..' म्हणण्यापूर्वी काय घडलं? Aviation Expert रोहित चंदावरकरांची महत्त्वपूर्ण माहिती

AI171 दुर्घटनेवर AAIB च्या प्रारंभिक अहवालात आतापर्यंतच्या तपासातील काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत:
- विमान किंवा इंजिनमध्ये कोणतीही यांत्रिक/देखभाल संबंधित त्रुटी आढळली नाही.
- सर्व आवश्यक देखभाल कार्ये वेळेवर पूर्ण झाली होती.
- इंधनाची गुणवत्ता योग्य होती, टेक-ऑफ सामान्य होते.
- दोन्ही वैमानिकांनी त्यांच्या अनिवार्य वैद्यकीय आणि ब्रेथ ॲनालायझर चाचण्या उत्तीर्ण केल्या होत्या.
- DGCA च्या देखरेखीखाली आमच्या संपूर्ण बोइंग 787 फ्लीटची तपासणी करण्यात आली — सर्व विमाने सेवायोग्य आढळली.
- अहवालात अद्याप कोणत्याही कारणाची पुष्टी झालेली नाही किंवा कोणतीही शिफारस दिलेली नाही.
- आम्ही सर्वांना विनंती करतो की कोणत्याही प्रकारच्या अटकळबाजीपासून दूर राहावे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com