जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

अमरनाथ यात्रेला जायचंय? 'या' पद्धतीनं लगेच करा रजिस्ट्रेशन

Amarnath Yatra : शिवभक्तांसाठी अमरनाथ यात्रेचं मोठं महत्त्व आहे.  यावर्षीचं अमरनाथ यात्रा करण्याचा तुमचा संकल्प असेल तर लगेच कामाला लागा. या यात्रेचं वेळापत्रक जाहीर झालंय.

अमरनाथ यात्रेला जायचंय? 'या' पद्धतीनं लगेच करा रजिस्ट्रेशन
अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे.
मुंबई:

Amarnath Yatra : शिवभक्तांसाठी अमरनाथ यात्रेचं मोठं महत्त्व आहे. जम्मू काश्मीरमधील बर्फाच्या गुहेतील 'बाबा बर्फानीं'चं दर्शन एकदा तरी घ्यावं अशी प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते.  यावर्षीचं अमरनाथ यात्रा करण्याचा तुमचा संकल्प असेल तर लगेच कामाला लागा. या यात्रेचं वेळापत्रक जाहीर झालं असून त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झालीय. यावर्षी 19 जूनपासून ही यात्रा सुरु होणार असून 29 ऑगस्टला समाप्त होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं या यात्रेचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल. हे रजिस्ट्रेशन करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कसं करणार रजिस्ट्रेशन?

अमरनाथ यात्रा 2024 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन शुल्क प्रत्येक व्यक्तीसाठी 150 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. या यात्रेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या बँकांच्या ब्रँचमधून तुम्ही ही फी भरु शकता. 
- ऑनलाईन रजिस्ट्रे्शन करण्यासाठी सर्वप्रथम jksasb.nic.in या वेबसाईटवर जा. 
- मेन्यूवर 'Online Service' वर क्लिक करा
- त्यानंतर Yatra Permit Registration वर क्लिक करा
- आता I Agree वर क्लिक करुन Register वर क्लिक करा
त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर ऑनलाईन फी ट्रान्सफर करा.

जम्मू-कश्मीर बँक, पंजाब नॅशनल बैंक, भारतीय स्टेट बँक आणि यस बँकेतील 540 शाखांमध्ये तुम्हाला ऑफलाईन रजिस्ट्रेशन देखील करता येईल. 

रामनवमीनिमित्त हवाई प्रवास महागला, अयोध्येसाठीच्या तिकीटदरात दुपटीने वाढ
 

हे लक्षात ठेवा

13 ते 70 वयोगटातील भाविकांनाच अमरनाथ यात्रा करता येईल. त्याचबरोबर 6 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भवती महिलांना देखील ही यात्रा करता येणार नाही. त्याचबरोबर अमरनाथ यात्रा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेल्थ सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com