
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय हल्ल्यात टॉप पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. ऑपरेशन सिंदूरमधील हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. यातील अनेक दहशतवादी अमेरिकेच्याही टार्गेटवर होते. जे अमेरिकेला जमलं नाही तर भारताने करून दाखवलं आहे, असंही म्हटलं जात आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा मुदस्सर खादियान खास (अबू जुंदाल), जैश-ए-मोहम्मदचा हाफिज मुहम्मद जमील, जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी, लष्कर-ए-तोयबाचा खालिद उर्फ अबू आकाश आणि जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद हसन खान यांचा खात्मा झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1 मुदस्सर खादियान खास /मुदस्सर/अबू जुंदाल - हा दहशतवादी लष्कर-ए-तौयबाचा असून मरकझ तौयबा, मुरीदकेचा प्रभारी होता. पाकिस्तानी लष्कराने त्याच्या अंत्यसंस्कारात गार्ड ऑफ ऑनर दिला होता. याचा व्हिडिओही समोर आला होता. यावेळी पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि पंजाबचे मुख्यमंत्री (मरियम नवाज) यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला होता. जमात-उद-दावाच्या हाफिज अब्दुल रौफ (जागतिक दहशतवादी ) याच्या नेतृत्वाखाली सरकारी शाळेत त्याची अंत्ययात्रा पार पडली. पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.
नक्की वाचा - India Pakistan Tension : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान तणावादरम्यान 2 बड्या देशांकडून मध्यस्थीचा प्रस्ताव
2. हाफिज मुहम्मद जमील - हा जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून तो मौलाना मसूद अझहर याचा ज्येष्ठ मेहुणा आहे. बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाहचा प्रभारी होता. तरुणांना कट्टरपंथी शिकवण आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी संकलनात सक्रिय सहभागी होता.
3 मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी/ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब - हा जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता. जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले होते. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. आयसी-814 विमान अपहरण प्रकरणात वॉन्ट्रेड दहशतवादी.
4 खालिद उर्फ अबू आकाश - हा दहशतवादी लष्कर-ए-तौयबाशी संबंधित होता. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये याचा सहभाग होता. अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात तो गुंतलेला होता. त्याच्यावर फैसलाबादमध्ये अंत्यसंस्कार पार पडले होते. ज्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.
5 मोहम्मद हसन खान - हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world