जाहिरात

India Pakistan Tension : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान तणावादरम्यान 2 बड्या देशांकडून मध्यस्थीचा प्रस्ताव

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

India Pakistan Tension : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान तणावादरम्यान 2 बड्या देशांकडून मध्यस्थीचा प्रस्ताव

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांकडून मध्यस्थीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधणे आणि चुकीचे अनुमान टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यातील वाद टाळण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने रचनात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला.

Fack check : भारताची रणरागिणी शिवानी सिंहचा 'तो' व्हिडिओ फेक; सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा सुळसुळाट

नक्की वाचा - Fack check : भारताची रणरागिणी शिवानी सिंहचा 'तो' व्हिडिओ फेक; सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा सुळसुळाट

सौदी अरेबियाकडूनही मध्यस्थीचा प्रस्ताव

विशेष म्हणजे सौदी अरेबियाच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांचा भारत आणि पाकिस्तान दौरा झाला. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाच्या सूचनेनुसार, परराष्ट्र राज्यमंत्री, मंत्री परिषद सदस्य व दूत आदेल बिन अहमद अल-जुबैर यांनी 8 ते 9 मे 2025 या कालावधीत भारत आणि पाकिस्तान दौरा केला. हा दौरा सौदी अरेबियाच्या पुढाकाराचा एक भाग होता. त्यामध्ये तणाव कमी करणे, सुरू असलेले लष्करी संघर्ष थांबवणे आणि सर्व वाद शांततामय, संवाद व राजनैतिक माध्यमांतून सोडवणे, हा उद्देश होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com