T20 विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीम गुरुवारी (4 जुलै) नवी दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया (Team India) भारतात दाखल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. बारबाडोस येथे आलेल्या वादळामुळे टीम इंडियाला काही दिवस तेथेच मुक्काम (team india t20 wc 2024 victory) करावा लागला होता. आज अखेर ते मायदेशी परतले आहेत. यासाठी एअर इंडियाने यूएस ते भारताचं नियोजित उड्डाण रद्द केलं आणि भारतीय क्रिकेट संघाला बार्बाडोसहून मायदेशी परतण्यासाठी चार्टर बोईंग 777 विमानाचा वापर केला.
एअर इंडियाने यासाठी यूएस ते भारत असे नियोजित उड्डाण रद्द केले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने टीम इंडियाला बार्बाडोसहून आणण्यासाठी विमान पाठवले होते. बेरील चक्रीवादळामुळे क्रिकेट संघाला निघण्यास उशीर झाला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष विमानाची व्यवस्था केली होती. पण एअर इंडियाचे बार्बाडोसमध्ये तैनात केलेले विमान मुळात न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणार होते. मात्र ऐनवेळी विमान बदलल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे DGCA ने याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.
T20 विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ आज सकाळी राष्ट्रीय राजधानीत पोहोचला, त्यावर एअर इंडिया चॅम्पियन्स 24 वर्ल्ड कप लिहिलेलं आहे. पण प्रत्यक्षात ते विमान अमेरिकेतून भारतात येणार होते. पण ते रद्द करून टीम इंडियाला आणण्यासाठी स्पेशल विमान म्हणून पाठवण्यात आले. एअर इंडियाचे म्हणणे आहे की, ज्या प्रवाशांनी 2 जुलै रोजी न्यूयॉर्क ते दिल्ली फ्लाइटसाठी तिकीट बुक केले होते त्यापैकी बहुतेकांना आगाऊ माहिती देण्यात आली होती.
नक्की वाचा - Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी टीम इंडिया ITC मौर्यमधून रवाना
मात्र टीम इंडियाला घेऊन येणाऱ्या विशेष विमानाबाबत वाद निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेटपटूंसाठी दुसरे विमानाचे उड्डाण रद्द केल्याबाबत DGCA ने एअर इंडियाकडून रिपोर्ट मागवला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने न्यूयॉर्क-दिल्ली उड्डाण रद्द केले होते.बार्बाडोसमधून क्रिकेटपटूंना मायदेशी आणण्यासाठी दुसरं विमान रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता DGCA ने एअर इंडियाकडून याबाबतचं स्पष्टीकरण मागितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world