
- पटना में बीजेपी नेता गोपाल खेमका की गोली मारकर हत्या कर दी गई है.
- घटना ट्विन टॉवर के पास हुई जब खेमका अपने घर लौट रहे थे.
- पुलिस ने बताया कि खेमका की घटनास्थल पर ही मौत हो गई.
- बिहार में यह पहली हत्या नहीं, कुछ महीने पहले मुजफ्फरपुर में एक प्रॉपर्टी डीलर की भी हत्या की गई थी.
बिहारच्या पाटणा येथे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि राज्यातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गांधी मैदान पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या ट्विन टॉवरजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की खेमका ट्विन टॉवरमधील त्यांच्या घरी परतले तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोपाळ खेमका यांचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पाटणा क्लबमधून घरी परतत असताना गोपाळ खेमका हॉटेल पानशजवळील अपार्टमेंटच्या गेटवर उतरताच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत पाटण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी गोपाळ खेमका यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. गोपाळ खेमका यांचा धाकटा भाऊ संतोष खेमका यांनी पोलिसांवर घोर निष्काळजीपणाचा आरोप करत सांगितले की, घटनेच्या दीड तासानंतर गांधी मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाटण्याचे एसपी देखील दोन तासांनी घटनास्थळी पोहोचले.
पोलीस स्टेशनपासून फक्त ३०० मीटर अंतरावर असलेला हा एक पॉश परिसर आहे. अनेक उच्च अधिकाऱ्यांची घरेही येथून अगदी जवळ आहेत. अशा परिस्थितीत गुन्हेगार उघडपणे येतात आणि एका उद्योगपतीला गोळ्या घालून आरामात निघून जातात. यावरून बिहारमध्ये काय चाललंय? बिहार पोलीस काय करत आहेत? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. सहा वर्षांपूर्वी वैशालीच्या औद्योगिक पोलीस स्टेशन परिसरात गोपाळ खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world