BJP Manifesto: भारतीय जनता पक्षाने (BJP) ने वर्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी म्हटले की, संपूर्ण देश भाजपच्या जाहिरनाम्याची प्रतीक्षा करत होते. यामागील मोठे कारण म्हणजे भाजपने आपल्या जाहिरनाम्यामध्ये मांडलेल्या प्रत्येक मुद्याची अंमलबजावणी मागील 10 वर्षामध्ये केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- आमचे लक्ष्य गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार आणण्यावर आहे. आम्ही दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा जाहीरनामा तरुणवर्गाच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. जाहिरनाम्यामध्ये तरुणांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
- विकसित भारताचे आधारस्तंभ असलेल्या तरुण, महिलावर्ग, गरीब, शेतकऱ्यांना संकल्प भारत सक्षम करण्याचे कार्य करतो. उच्च मूल्यांवर आधारित असणाऱ्या सेवेवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.
- मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू राहणार आहे. गरिबांच्या जेवणाची थाळी अधिक पौष्टिक आणि स्वस्त असेल, याकडे लक्ष दिले जाईल.
मोदी की गारंटी है कि मुफ्त राशन की योजना आने वाले 5 साल तक जारी रहेगी।
— BJP (@BJP4India) April 14, 2024
हम ये सुनिश्चित करेंगे कि गरीब के भोजन की थाली पोषणयुक्त हो, उसके मन को संतोष देने वाली हो और अफोर्डेबल हो, सस्ती हो।
- पीएम @narendramodi#ModiKiGuarantee pic.twitter.com/lcHo3a6Uom
- जनऔषधी केंद्रावर 80 टक्के सवलत मिळत राहील आणि या योजनेचा विस्तारही करण्यात येईल.
- 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेअंतर्गत आणले जाईल.
- 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार सुविधा मिळतील. मग संबंधित व्यक्ती गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असली तरीही सुविधा मिळणार.
आणखी तीन कोटी घरे बांधणार
- भाजप सरकारने गरिबांसाठी 4 कोटी पक्क्या स्वरुपातील घरे बांधली आहेत. आता राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त माहितीचा विचार करून आम्ही आणखी 3 कोटी घरे बांधण्याचे संकल्प करत आहोत.
- आतापर्यंत आम्ही प्रत्येक घराघरात स्वस्त दरातील सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही पाईपच्या माध्यमातून स्वस्त स्वयंपाक गॅस योजना प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचे कार्य वेगाने करणार आहोत.
अब भाजपा ने संकल्प लिया है कि 70 वर्ष की आयु से ऊपर के हर बुजुर्ग को आयुष्मान योजना के दायरे में लाया जाएगा।
— BJP (@BJP4India) April 14, 2024
70 साल से ऊपर का हर बुजुर्ग, चाहे वो गरीब हो, मध्यम वर्ग का हो या फिर उच्च मध्यम वर्ग से ही क्यों न हो, उन्हें 5 लाख रुपये तक के मुफ्त इलाज की सुविधा मिलेगी।
- पीएम… pic.twitter.com/mpIvRUa7r5
"आजचा दिवस अतिशय शुभ"
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, "आजचा दिवस अतिशय शुभ आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण सर्वजण कात्यायनी देवीची पूजा करतो आणि कात्यायनी देवीने आपल्या दोन्ही हातांमध्ये कमळाचे फुल धारण केलेले आहे. हा योगायोग देखील मोठा आशीर्वाद आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील आहे. अशा शुभ मुहूर्तावर आज भाजपने विकसित भारताचा जाहीरनामा देशासमोर ठेवला आहे. मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासीयांनाही खूप खूप शुभेच्छा देतो."
आज बहुत ही शुभ दिन है।
— BJP (@BJP4India) April 14, 2024
देश के कई राज्यों में इस समय नववर्ष का उत्साह है।
आज नवरात्रि के छठे दिन हम सभी मां कात्यायनी की पूजा करते हैं और मां कात्यायनी अपनी दोनों भुजाओं में कमल धारण किए हुए हैं।
ये संयोग भी बहुत बड़ा आशीर्वाद है।
- पीएम @narendramodi #ModiKiGuarantee pic.twitter.com/vqzrqXmcYr
आज बाबा साहेब अंबेडकर की जयंती भी है।
— BJP (@BJP4India) April 14, 2024
ऐसे पावन समय में आज भाजपा ने विकसित भारत के संकल्प पत्र को देश के सामने रखा है।
मैं आप सभी को, सभी देशवासियों को बहुत-बहुत बधाई देता हूं।
- पीएम @narendramodi#ModiKiGuarantee pic.twitter.com/iBkGuEYdz4
आणखी वाचा
भावना गवळींचा निर्णय झाला, मुख्यमंत्र्यांचं नाव घेत केली घोषणा
पक्षाने नाकारले पण विशाल पाटलांनी सावरले, एक कृती अन् मन जिंकली
'राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू काँग्रेसमध्ये बेदखल'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world