जाहिरात
This Article is From Aug 06, 2024

मोठी बातमी : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हॉस्पिटलमध्ये दाखल

Lal Krishna Advani : माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (L K Advani ) यांना नवी दिल्लीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मोठी बातमी : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हॉस्पिटलमध्ये दाखल
LK Advani : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबई:

Lal Krishna Advani Health Update : माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (L K Advani ) यांना नवी दिल्लीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

96 वर्षांच्या अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आज (मंगळवार, 6 ऑगस्ट) रोजी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी PTI ला दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लालकृष्ण अडवाणी यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमधील वरिष्ठ डॉक्टर विनित सुरी यांच्या देखरेखीमध्ये काही दिवस ठेवण्यात आले होते. 

( नक्की वाचा : बांगलादेशवरील बैठकीत राहुल गांधींनी विचारला पाकिस्तानवर प्रश्न, परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं उत्तर )

त्यापूर्वी अडवाणी यांना नवी दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये  (AIIMS) दाखल करण्यात आले होते. त्यांना एका दिवसाच्या मुक्कामानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.