
Lal krishna Advani: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांचा 8 नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असतो. आडवाणी यांचे वय 97 वर्षे आहे. अवघे दोन खासदार असलेल्या भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात ज्या नेत्यांनी कष्ट केले त्या नेत्यांमध्ये लालकृष्ण आडवाणी यांचेही नाव घेतले जाते. कट्टर हिंदुत्वाची भूमिका स्वीकारत भाजपच्या उजव्या विचारसरणीच्या राजकारणाला दिशा देणारे नेते म्हणूनही आडवाणी यांची ओळख आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म कधी झाला?
ब्रिटीश राजवटीत म्हणजेच 8 नोव्हेंबर 1927 रोजी आडवाणींचा जन्म कराचीत झाला. अवघे 14 वर्षांचे असताना त्यांचा राजकारणात रस निर्माण झाला होता. आडवाणी यांनी आरएसएसचा स्वयंसेवक बनण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पक्ष या अनेक दशकांच्या प्रवासामध्ये आडवाणी यांची संघावरील निष्ठा आणि पक्षाप्रति असलेले समर्पण कधीही कमी झाले नाही. कराचीमध्ये असतानाच आडवाणी हे संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले होते.
(नक्की वाचा: Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट)
फाळणीनंतर आडवाणी शिक्षणासाठी मुंबईला आले आणि त्यानंतर ते राजस्थानामध्ये स्थायिक झाले. 1951 साली आडवाणी यांना भारतीय जनसंघाचे राजस्थान राज्याचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. 1970 साली भारतीय जनसंघाने आडवाणींना दिल्लीची जबाबदारी दिली. त्याचवर्षी आडवाणी हे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. जनता सरकारमध्ये त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला होता. आणीबाणीच्या काळात वृत्तसंस्थांना प्रचंड त्रास देण्यात आला होता. वृत्तस्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली होती. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आडवाणींनी बरेच काम केले होते. त्यांनी वृत्तसंस्थांवरील सगळे निर्बंध दूर केले, माध्यमांवर लादण्यात आलेली सेन्सॉरशिप हटवली आणि मोकळेपणाने वार्तांकन करण्यासाठी वृत्तसंस्थांना आवश्यक ते वातावरण निर्माण करून दिले.
(नक्की वाचा: संसदेतील पहिल्या भाषणात प्रियांका गांधींनी वापरला M3 फॉर्म्युला ! काय आहे काँग्रेसचा नवा प्लान?)
1998 साली आडवाणींनी गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर गांधीनगर म्हणजे लालकृष्ण आडवाणी असे समीकरण बनले होते. 2002 साली आडवाणी भारताचे उपपंतप्रधान झाले. उपपंतप्रधान पदावरून पायऊतार झाल्यानंतरही आडवाणी यांचे भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ राहिले होते. सात दशकांच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या आडवाणींनी 2009पर्यंत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पार पाडली होती.
लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी
- लालकृष्ण आडवाणींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बराच काळ जबाबदारी सांभाळली होती. अनेकदा त्यांचे तरुण नेत्यांसोबत वैचारिक संघर्ष व्हायचे. 2005 ते 2013 या काळात त्यांनी अध्यक्षपदाचा तीनवेळा राजीनामा दिला होता.
- क्रिकेट आणि बॉलिवूड हे आडवाणींचे आवडीचे विषय. ऑल्विन टॉफलर यांनी बदलत्या जगानुसार स्वत:ला बदलण्याबद्दल केलेले लिखाण आडवाणींचे आवडते आहे.
- 2015 साली आडवाणींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
- 1998-2004 या काळात आडवाणींनी देशाचे गृहमंत्रिपद सांभाळले.
- 1944 साली अवघे 17 वर्षांचे असताना आडवाणी यांनी कराचीतील मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले होते. ते गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय शिकवायचे.
- आडवाणींनी तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आहे. अध्यक्षपद दीर्घकाळ भूषवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे नोंद आहे.
- आडवाणी हे 4 वेळा राज्यसभेवर आणि 5 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
- 1990 नंतर भाजपने आपला ट्रॅक बदलत कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणे सुरू केले, लालकृष्ण आडवाणी यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- 1990 ते 1991 दरम्यान आडवाणी हे लोक सभेच्या सचिवालय समितीचे आढावा अध्यक्ष होते.
- 1999 साली आडवाणींना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले होते.
- 'माय कंट्री, माय लाइफ' या त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन 19 मार्च 1998 साली ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आले होते.
- 31 मार्च 2024 रोजी लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world