जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील झेलम नदीत मंगळवारी सकाळी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
#WATCH | J&K: Search and rescue operation underway after a boat capsized in River Jhelum at Gandbal, Srinagar
— ANI (@ANI) April 16, 2024
More details awaited. https://t.co/WDU0ggiMA4 pic.twitter.com/67QKjm0WoJ
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील गंडाबल येथील झेलम नदीत सात जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. "एसडीआरएफ, पोलिस आणि लोकांनी ताबडतोब बचावकार्य सुरू केले. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर तिघांना उपचारासाठी श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पीडितांचे मृतदेह सापडले आहेत मृतदेहाच्या वैद्यकीय-कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली."
मुसळधार पावसामुळे झेलम नदीची पाण्याची पातळी खूप उंचावली आहे, सोमवारी झालेल्या पावसामुळे भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता. जम्मू-काश्मीर वाहतूक पोलिसांनी सांगितले की, "किश्तवारी पाथेरमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलनामुळे NH-44 ब्लॉक करण्यात आले आहे. लोकांना या भागात प्रवास टाळण्याचा सल्ला ही देण्यात आला आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world