जाहिरात

Who Is Viral Ravi Sharma: 100 कोटींचा टर्नओव्हर, महागडी कार, घड्याळे... जोरदार फेकाफेकी करणारा रवी शर्मा कोण?

Viral Network Marketing Man Ravi Sharma: रवी शर्माचे व्हिडिओ त्याच्या अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांमुळे आणि चकाचक जीवनशैलीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या नेटवर्क मार्केटिंग उपक्रमांशी संबंधित आश्वासनांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे.

Who Is Viral Ravi Sharma: 100 कोटींचा टर्नओव्हर, महागडी कार, घड्याळे... जोरदार फेकाफेकी करणारा रवी शर्मा कोण?

Viral Network Marketing Man: सध्या सोशल मीडियावर एक नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते नाव आहे रवी शर्मा. आपल्या आलिशान जीवनशैली, महागड्या गाड्या, महागडी घड्याळे आणि कोट्यवधी रुपयांच्या कमाईच्या दाव्यांमुळे रवी वर्माचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काहीजण त्याच्या या दाव्यांवर विश्वास ठेवून प्रभावित झाले आहेत, तर अनेकजण संशयाच्या नजरेने पाहत आहेत. अनेक लोक त्याला 'व्हायरल रवी शर्मा' म्हणून ओळखू लागले आहेत.

कोण आहे रवी शर्मा?

व्हायरल व्हिडिओमधील त्या व्यक्तीने स्वतःची ओळख रवी शर्मा अशी करून दिली आहे. त्यानंतर, लोकांनी सोशल मीडियावर त्याचा शोध सुरू केला. रवी शर्मा ज्या RCM नेटवर्क मार्केटिंग कंपनीबद्दल बोलत आहे, त्याचे वडील देखील त्याच कंपनीशी संबंधित आहेत. या कंपनीच्या मालकीच्या वेबसाइटवर रवी शर्मा यांच्या नावाचा एक लेख प्रकाशित झाला होता.

अहवालानुसार, तो राजस्थानमधील जयपूरचा रहिवासी आहे आणि लेखात तो करोडपती असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तो करोडपती असला तरी, मोठ्या उलाढालीच्या आणि महागड्या गाड्यांच्या आमिषाने या नेटवर्कमध्ये अडकलेल्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

कोट्यवधींच्या कमाईचा दावा

रवी शर्माने एका व्हिडिओमध्ये आपल्या कमाईचा आणि व्यवसायाचा सविस्तर उल्लेख करताना म्हटलं की, "माझा मासिक टर्नओव्हर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. माझा महिना 30 तारखेला संपतो. जर तुम्ही माझ्या कमाईने किंवा पैशाने प्रभावित होत असाल, तर मी दर महिन्याला 6 लाख फक्त जीएसटी भरतो. माझी कमाई या व्यतिरिक्त आहे. तुम्ही हिशोब करत बसा."

महागड्या गाड्यांचा संग्रह

आपल्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचा दावा देखील तो करतो. "माझ्याकडे मर्सिडीज, दोन बीएमडब्ल्यू, ऑडी, सेल्टोस, स्कोडा आणि नुकतीच खरेदी केलेली स्कॉर्पिओ आहे. लवकरच मी माझी 'ड्रीम कार' Rolls-Royce खरेदी करेन, ज्याची किंमत फक्त 8 कोटी रुपये आहे. मी ती 2030 ते 2035 दरम्यान घेईन," असाही दावा तो करत आहे.

तो आपल्या गाड्यांशी संबंधित खर्चही सांगतो. "गेल्या वर्षी मी BMW X5 खरेदी केली. तिच्या एका टायरची किंमत 50,000 रुपये आहे. नुकताच मी एका कार्यक्रमासाठी मुघलसरायला गेलो होतो, तिथे फक्त पेट्रोलवर 25,000 रुपये खर्च केले. मी फक्त बोलत नाही, करून दाखवतो," असे तो ठामपणे सांगतो.

नेटवर्क मार्केटिंग आणि त्याचे धोके

व्हायरल रवी शर्मा नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित आहे. तो आपल्या फॉलोअर्सना पैसा आणि अलिशान जीवनशैलीचं आश्वासन देऊन प्रेरित करतो. "पुढच्या वेळी लोकांना मोठ्या संख्येने घेऊन या, मी तुमच्यासाठी गाड्या घेऊन येईन. तुमचे नेटवर्क वाढवत राहा. जर तुम्ही 5000 लोक एकत्र केले, तर मी हेलिकॉप्टरने तिथे उतरेल," असे तो उत्साहाने सांगतो.

रवी शर्माचे व्हिडिओ त्याच्या अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांमुळे आणि चकाचक जीवनशैलीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या नेटवर्क मार्केटिंग उपक्रमांशी संबंधित आश्वासनांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. अनेकदा अशा दाव्यांमध्ये जोखीम असते आणि केवळ मोठ्या कमाईच्या आमिषाने त्यात सामील होणे धोकादायक ठरू शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com