IRCTC Ticket Booking Rules: रेल्वे तिकीट बुकिंगचा नवा नियम आजपासून (5 जानेवारी 2026) लागू झाला आहे. यामुळे घरबसल्या काही मिनिटांमध्ये ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. मोबाइलवरून कुठेही आणि कधीही तिकीट बुक करता येईल, महत्त्वाचे म्हणजे दलालांना फायदा घेता येणार नाही. IRCTC च्या नव्या नियमांनुसार, 5 जानेवारीपासून आधार कार्डशी आयडी लिंक केलेले युजर्सच सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिकीट बुक करू शकतील. अॅडव्हान्स तिकीट बुकिंग कालावधी 60 दिवस आधी सुरू होतो. त्यानुसार संबंधित ट्रेनची तिकीट बुकिंग विंडो खुली होईल, त्याच ट्रेनसाठी हा नियम लागू असेल. भारतीय रेल्वेने (IRCTC) हा नियम तीन टप्प्यात लागू केला आहे. पहिला टप्पा 29 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाला. दुसरा टप्पा 5 जानेवारी रोजी लागू करण्यात आलाय आणि तिसरा टप्पा 12 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल.
- 29 डिसेंबरपासून 2025पासून आधार लिंक युजर्स सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तिकीट बुक करू शकतात.
- 5 जानेवारीपासून सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत (8 तास) तिकीट बुकिंग करता येईल.
- 12 जानेवारीपासून सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत युजर्स ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील.
ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये गैरव्यवहाराच्या तक्रारी
IRCTC च्या या नियमाचा उद्देश सामान्य प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंगची अधिक संधी देणे आहे. अनेकदा दलाल आणि तिकीट बुकिंगचा व्यवसाय करणारे लोक मोठ्या प्रमाणावर अॅडव्हान्स तिकीट बुक करून घेतात. त्यामुळे गरजू प्रवाशांना तिकीट मिळत नाही. होळी, दिवाळी किंवा अन्य कोणतेही सण असो 60 दिवस आधी तिकीट बुकिंग सुरू होताच, काही मिनिटांतच जागा फुल झाल्याचे दिसते. याबाबत रेल्वेकडे तक्रारी येत होत्या.
रेल्वेचा नवा नियम फक्त जनरल कोट्यातील आरक्षित तिकीट बुकिंगसाठी लागू करण्यात आलाय. ट्रेन तिकीट दलाली आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून झपाट्याने तिकीट बुक करणाऱ्यांवर यामुळे आळा बसेल. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला ठराविक तारीख, सण, लग्नकार्य इत्यादींसाठी आधीच तिकीट बुक करणे सोपे होईल. तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी आठ तासांपर्यंत एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत. फक्त सामान्य प्रवाशांनाच याचा फायदा मिळेल.
1. आधार कार्डद्वारे ट्रेन तिकीट कसे बुक होईल?
रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाचे IRCTC खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तिकीट बुक करताना तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतरच तिकीट बुकिंग पूर्ण होईल.
2. आधार लिंक नसल्यास तिकीट कसे बुक कराल?
जर तुमचे IRCTC लॉगइन आयडी आधार कार्डशी लिंक नसेल, तर ते तत्काळ लिंक करा किंवा आयडी नसेल तर नवीन आयडी तयार करा. आधारकार्ड लिंक नसेल तर 60 दिवस आधी बुकिंग सुरू होणाऱ्या पहिल्या आठ तासांत तुम्हाला तिकीट बुक करता येणार नाही.
3. काउंटरवरून तिकीट बुकिंग कसे होईल?जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बाहेरील काउंटरवरून तिकीट बुक करत असाल, तरीही ओटीपी येईल आणि त्याच आधारे तिकीट बुक होईल. यासाठी प्रवाशाचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. नातेवाईक किंवा अन्य कोणी तिकीट घेत असले तरीही ओटीपी क्रमांक आवश्यक आहे.
(नक्की वाचा: PAN-Aadhaar Link: डेडलाइन संपली! तुमचे PAN Card इनअॅक्टिव्ह झालंय का? काही सेकंदांत असे तपासा स्टेटस)
IRCTC युजर आयडी आधार कार्डशी कसे लिंक करावे?- IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर लॉगइन करा.
- My Profile सेक्शनमध्ये जा .
- Aadhaar KYC हा पर्याय निवडा
- मोबाइल नंबर आणि आवश्यक माहिती भरावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
