सोशल मीडियाच्या जगात रोज अनेक अजब आणि चक्रावून टाकणारे व्हिडिओ समोर येत असतात. पण सध्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून समोर आलेल्या एका घटनेने सर्वांनाच थक्क केले आहे. इथे एका माकडाने थेट पैशांचा पाऊस पाडल्याची घटना घडली आहे. एका झाडावर बसून माकड खाली नोटा फेकत असल्याचे आणि खाली उभे असलेले लोक त्या नोटा गोळा करण्यासाठी पळापळ करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ही अजब घटना शनिवार रोजी बुलंदशहर येथील जिल्हा न्यायालय परिसराजवळ घडली. एक व्यक्ती जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यासाठी न्यायालयाच्या आवारातील एका वकिलाच्या चेंबरमध्ये आला होता. त्याच्याकडे सुमारे 2 लाख रुपयांची रोकड असलेली एक बॅग होती. तो व्यक्ती चेंबरमध्ये कामात व्यस्त असतानाच अचानक तिथे एक माकड आले. त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता पैशांची बॅग हिसकावून घेतली आणि तिथून थेट धूम ठोकली.
पाहा VIDEO
उत्तर प्रदेश के बुलंदशहर का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. जिसमें एक बंदर पेड़ पर चढ़कर पैसों की बरसात करता नजर आ रहा है.असल में एक व्यक्ति जमीन से जुड़े कागजी काम पूरे करने के लिए एक वकील के चैंबर में आया था. उसके पास करीब 2 लाख रुपये नकद से भरा एक बैग था. इसी दौरान… pic.twitter.com/JaZKWlWmgR
— NDTV India (@ndtvindia) June 1, 2026
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
झाडावर चढून पाडला नोटांचा पाऊस
बॅग हातात लागताच माकड न्यायालयाच्या आवारातील एका उंच झाडावर जाऊन बसले. बॅगेत खाण्याचे काहीतरी असेल या आशेने माकडाने ती बॅग उघडली, मात्र आत नोटांचे बंडल पाहून त्याने एक-एक करून नोटा खाली फेकण्यास सुरुवात केली.
झाडावरून 500 आणि 10 रुपयांच्या नोटा हवेत उडत खाली पडताना पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे डोळे विस्फारले. बघता बघता संपूर्ण रस्ता आणि आसपासचा परिसर नोटांनी भरून गेला. झाडावरून पैशांचा पाऊस पडत असल्याचा हा अजब नजारा पाहण्यासाठी आणि खाली पडलेल्या नोटा गोळा करण्यासाठी तिथे नागरिकांची गर्दी जमली.
(नक्की वाचा- ICC Rule Changes: वाईड बॉलसह क्रिकेट सामन्यांचे अनेक नियम बदलणार, ICC चा ऐतिहासिक निर्णय)
स्थानिकांच्या मदतीमुळे अनर्थ टळला
माकडाने बॅग पळवल्याचे लक्षात येताच त्या पीडित व्यक्तीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली होती. त्याचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक आणि वकिलांचे इतर कर्मचारी त्याच्या मदतीसाठी धावून आले. लोकांनी हुशारी दाखवत माकडाला केळी आणि इतर खाद्यपदार्थ दाखवून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान खाली पडणाऱ्या नोटा इतर कोणी चोरून नेणार नाही, याची काळजी घेत स्थानिकांनी त्या गोळा करून मूळ मालकाकडे सुपूर्द केल्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर, 2 लाख रुपयांपैकी तब्बल 1 लाख 98 हजार रुपये सुरक्षितपणे परत मिळवण्यात यश आले. माकडाने फाडल्यामुळे किंवा हवेत उडाल्यामुळे केवळ 2 हजार रुपयांचे नुकसान झाले. सध्या या घटनेचा ५३ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world