
एडटेक फर्म बायजू चालविणारी कंपनी थिंक अँड लर्नने आपल्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचा आंशिक पगार दिला आहे. आर्थिक संकटाचा सामना करणारी थिंक अँड लर्नचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याचा पगार देण्यासाठी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर कर्ज काढलं आहे.
दरम्यान कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार देण्यात आला नसून पगारातील काही भाग देण्यात आल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांना दिलेल्या अंशिक पगाराची रक्कम 25 ते 30 कोटी रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे. शनिवार 20 एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला आहे.
एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याचं कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी रवींद्रन यांनी व्यक्तिगत कर्ज काढलं आहे. याचे कारण म्हणजे राइट्स इश्यूचे (राइट्स इश्यू - या प्रक्रियेत फक्त कंपनीच्या सद्याच्या शेअरधारकांना कंपनीचे नवे शेअर खरेदी करण्याची संधी दिली जाते.) पैसे अजूनही परदेशी गुंतवणूकदारांनी रोखून ठेवले आहेत. शिक्षक आणि सर्वात कमी वेतनच्या कर्मचाऱ्यांना पगाराची 100 टक्के रक्कम देण्यात आली आहे. बायजू गेल्या वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. यादरम्यान कंपनीतील गुंतवणूकदारही वेगळे झाले आहे आणि कंपनीच्या राइट इश्यूदेखील वादाच्या भोवऱ्यात आहे.
हे ही वाचा-बुद्धीबळाच्या पटावर नवीन भारतीय ताऱ्याचा उदय, डी. गुकेशची ऐतिहासिक कामगिरी
गेल्या वर्षी बायजू यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी स्वत:चं राहतं घर गहाण ठेवावं लागलं होतं. आणि आता बायजू यांनी कर्ज काढून कर्मचाऱ्यांचा पगार दिला आहे. काही दिवसांपूर्वी बायजूला आणखी एक धक्का बसला होता. सात महिन्यांपूर्वी एडटेक फर्म बायजूचे सीईओ पदी नेमण्यात आलेले अर्जुन मोहन यांनी कंपनीतून राजीनामा दिला होता. मोहन यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी कंपनीचं दैनंदिन कामकाजाची जबाबदारी घङेतली. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एडटेक कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोहन यांची भारतीय ऑपरेशन्सचे सीईओ म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world