जाहिरात

पेजर ब्लास्ट होतो मग EVM ही हॅक होऊ शकतं? निवडणूक आयुक्तांनी असं समजावलं की कायमचं लक्षात राहील

Election Commission On EVM Hack: ईव्हीएमबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राजीव कुमार यांनी म्हटलं की, आमच्याकडे ईव्हीएमच्या काही तक्रारी आहेत. प्रत्येक तक्रारीचं आम्ही  फॅक्ट बाय फॅक्ट उत्तर देणार आहोत. आम्ही प्रत्येक उमेदवारांना उत्तर देऊन, ते आमचं कर्तव्य आहेत. 

पेजर ब्लास्ट होतो मग EVM ही हॅक होऊ शकतं? निवडणूक आयुक्तांनी असं समजावलं की कायमचं लक्षात राहील
EVM Controversy

निवडणुका म्हटलं की ईव्हीएमचा विषय येतोच. विरोधक EVM वर सातत्याने संशय उपस्थित करत आहे. ईव्हीएम हॅक करुन मतांचा घोळ केला जातो, ज्याचा फायदा भाजपला होतो, असा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो. मात्र केंद्रीय निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार यांना ईव्हीएम कसं सुरक्षित आणि पारदर्शक आहे, याची सविस्तर माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली. 

ईव्हीएमबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राजीव कुमार यांनी म्हटलं की, आमच्याकडे ईव्हीएमच्या काही तक्रारी आहेत. प्रत्येक तक्रारीचं आम्ही  फॅक्ट बाय फॅक्ट उत्तर देणार आहोत. आम्ही प्रत्येक उमेदवारांना उत्तर देऊन, ते आमचं कर्तव्य आहेत. 

लोक आता आम्हाला विचारतात की एखाद्या देशात पेजरने ब्लास्ट घडवून आणले जातात तर ईव्हीएम कसं हॅक होऊ शकत नाही? याबाबत सांगतो की पेजर कनेक्टेड असतं. मात्र ईव्हीएम कशालाही कनेक्टेड नसतं. ईव्हीएमच्या वापर कसा केला जाते याबाबत सविस्तर सांगताना राजीव कुमार यांनी म्हटलं की, निवडणुकीआधी पाच-सहा महिन्यांपूर्वी ईव्हीएमचं फर्स्ट लेव्हल चेकिंग होतं, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

(नक्की वाचा- Maharashtra Election 2024 : विधानसभेचं बिगुल वाजलं! तुमच्या मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी कधी? वाचा वेळापत्रक)

कशी असते संपूर्ण प्रक्रिया?

फर्स्ट लेव्हल चेकिंगनंतर ईव्हीएम स्टोरेजमधून बाहेर काढणे, तपासणी करणे, मतदान केंद्रावर घेऊन जाणे, तिथे मतदानानंतर सील करणे, पुन्हा स्टोअर रुममध्ये आणणे, मतमोजणीच्या दिवशी बाहेर काढणे, सील तोडणे अशा प्रत्येक वेळी पक्षाचा, उमेदवाराची किंवा त्यासंबंधित व्यक्ती तिथे उपस्थित असतो. जेव्हा ईव्हीएम वापरासाठी काढलं जातं, तेव्हा त्यामध्ये बॅटरी टाकली जाते, असंही राजीव कुमार यांनी सांगितलं. 

ईव्हीएम बॅटरीवर सह्या

मतदानाच्या 5-6 दिवस आधी जेव्हा ईव्हीएम वापरासाठी काढलं जातं, तेव्हा मशीनमध्ये चिन्ह टाकली जातात. त्याचवेळी मशीनमध्ये बटरी टाकली जाते. या प्रक्रियेदरम्यान मशीनसह बॅटरीवर देखील उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या जातात. आम्ही कधी हा नियम बनवला होता माहीत नाही, मात्र आता तो कामी येत आहे. 

(नक्की वाचा- Maharashtra Election : 2024 मध्ये महायुती की मविआ? आकडेवारीतून समजून घ्या निवडणुकीचं चित्र)

व्हिडीओ शूटिग होते

त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात. स्ट्राँग रुममध्ये देखील तीन टप्प्यांची सुरक्षा असते. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवसी मशीन बाहेर काढले त्यावेळी देखील तिथे हीच प्रक्रिया असते. सगळी प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली जाते. मशीनचे नंबर देखील प्रतिनिधींना शेअर केले जातात. पूर्ण दिवस मतदानानंतर देखील प्रत्येक टप्प्यात पारदर्शक प्रक्रिया होते, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
महाराष्ट्र आणि झारखंड कसं जिंकणार? वाचा भाजपा-काँग्रेसचा पूर्ण प्लॅन
पेजर ब्लास्ट होतो मग EVM ही हॅक होऊ शकतं? निवडणूक आयुक्तांनी असं समजावलं की कायमचं लक्षात राहील
maharashtra-jharkhand-assembly-elections-2024-cec-rajeev-kumar--on-exit-polls-early-trends
Next Article
Exit Polls : Nonsense...एक्झिट पोलवर भडकले निवडणूक आयुक्त, जाहीरपणे दिला सल्ला