जाहिरात
This Article is From Jul 27, 2024

जम्मू-काश्मीरमध्ये कार दरीत कोसळली; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir Accident : अपघातग्रस्त कार किश्तवाडहून सिंथन टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात असताना त्यांची कार रस्त्यावरून घसरले आणि डाकसुम येथे घाटात कोसळली. , असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये कार दरीत कोसळली; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी कार दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच मुलांसह एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी, दोन महिला आणि 6 ते 16 वयोगटातील पाच मुलांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अपघातग्रस्त कार किश्तवाडहून सिंथन टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात असताना त्यांची कार रस्त्यावरून घसरले आणि डाकसुम येथे घाटात कोसळली. , असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: