जाहिरात

Heart Attack : हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टराचा हार्टअटॅकने मृत्यू, रुग्णालयातच कोसळले

चेन्नईतील 'सेवेथा मेडिकल कॉलेज'मध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.

Heart Attack : हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टराचा हार्टअटॅकने मृत्यू, रुग्णालयातच कोसळले
  • Dr Gradlin Roy, 39, died of a heart attack during rounds at a Chennai hospital
  • He suffered a massive cardiac arrest from 100% left main artery blockage
  • Experts link young doctors' cardiac deaths to long hours, stress, and poor lifestyle
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

चेन्नईतील एका रुग्णालयात 39 वर्षीय हृदय शल्यचिकित्सकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात कामावर असतानाच ते कोसळले आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले.

चेन्नईतील 'सेवेथा मेडिकल कॉलेज'मध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. बुधवारी कामावर असतानाच ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, पण दुर्दैवाने त्यांचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती हैदराबादमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी दिली आहे.

(नक्की वाचा-  Beed News: भरधाव कंटेनरने 6 जणांना चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू; चालत देवदर्शनाला जाताना भयंकर घडलं)

डॉ. सुधीर कुमार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "डॉ. रॉय यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सीपीआर, तातडीने ॲंजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग, इंट्रा-ऑर्टिक बलून पंप आणि अगदी ईसीएमओ सारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतींचाही वापर केला गेला. पण 'लेफ्ट मेन आर्टरी ब्लॉकेज' 100% झाल्यामुळे झालेल्या प्रचंड हृदयविकाराच्या झटक्याने झालेले नुकसान भरून काढता आले नाही."

तज्ज्ञांच्या मते, तरुणांच्या अशा अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे कामाचे जास्त तास. डॉक्टर अनेकदा 12 ते 18 तास काम करतात, तर कधीकधी एका शिफ्टमध्ये 24 तासांपेक्षा जास्तही काम करावे लागते. यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर प्रचंड ताण येतो. जीव वाचवण्याच्या निर्णयांचे सततचे दडपण, रुग्णांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि कायदेशीर चिंता यामुळे मानसिक ताण आणखी वाढतो.

(नक्की वाचा -  Nandurbar News: यातना संपणार कधी? झोळीतून नेताना आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती)

अनियमित जीवनशैली, जेवणाच्या चुकीच्या वेळा, व्यायामाचा अभाव आणि आरोग्याच्या तपासणीकडे होणारे दुर्लक्ष ही सुद्धा या मृत्यूंची महत्त्वाची कारणे आहेत. व्यावसायिक जीवनातील मानसिक ताण जसे की, बर्नआउट, नैराश्य आणि चिंता याकडेही अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com