सरन्यायाधीशांनी हिंदीतून लिहिली चिठ्ठी,चार आवडत्या आसनांबद्दल दिली माहिती

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड हे गेल्या 26 वर्षांपासून योगा करत आहेत. योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी योगासनांचे महत्त्व समजावून सांगितले. योग आणि जीवनातील 4 महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही त्यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुप्रीम कोर्टातही योग दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीशांनी उपस्थितांना योग आणि जीवनातील 4 धडे याबाबत समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी ते योगासने करत होते. सूर्यनमस्कार घालत असताना त्यांच्या पाठीत उसण भरली होती. यातून आपण एक धडा शिकलो तो म्हणजे आपण नेहमी नम्र राहिले पाहिजे असे सरन्यायाधीशांनी सांगितले. योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीचे कर्मचारीही सहभागी झाले होते. 
सरन्यायाधीशांनी या कार्यक्रमात बोलताना त्यांच्या 90 वर्षीय योगगुरुंबाबतही सांगितले. अनंत लिमये उर्फ ​​लिमये काका यांनी आपल्याला योगाचे धडे दिले. लिमये हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी असून ते सध्या पुण्यात राहतात असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

CJI चंद्रचूड यांनी सांगितला की योग दिन अर्थात 21 जून हा एखाद्या उत्सवासारखा आहे. 'योग'साधनेत उत्तम आरोग्यासाठी शारीरिक श्रम आणि व्यायामाला महत्त्व दिले जाते. योग हा आध्यात्मिक प्रगतीचा मार्गही आहे. सरन्यायाधीशांनी सांगितले की ते गेल्या 26 वर्षांपासून योग साधना करत आहेत, ज्यामध्ये अलोम-विलोम, कपाल भाती, ताडासन, पवन मुक्तासन इत्यादींचा समावेश आहे. एनडीटीव्हीच्या हाती सरन्यायाधीशांनी हिंदीत लिहिलेला संदेश लागला असून ज्यामध्ये त्यांनी योगातून कोणती मूल्ये शिकू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की,  योग आपल्याला चार S शिकवतो. ते म्हणजे

Advertisement

- सिद्धांत - शैली
- समन्वय - शरीर आणि श्वासोच्छवासातील
- सद्भावना - पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याचा आदर
- सशक्तीकरण - वैयक्तिकरित्या, सामाजिक आणि राष्ट्रीयरित्या एक भावना

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे NDTV शी एक्स्लुझिव्ह बातचीत करताना सांगितले होते की गेली 26 वर्षे ते दररोज पहाटे 3.30 वाजता उठतात आणि  योगासने करतात. 

Advertisement
Topics mentioned in this article