Delhi Blast News : सोमवारचा दिवस देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरासाठी मोठ्या घडामोडींचा आणि दहशतवादी कटाच्या (Terror Plot) शक्यतेसह आला. सकाळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी (J&K Police) फरीदाबादमध्ये (Faridabad) हजारो किलो विस्फोटक (Explosives) आणि शस्त्रे (Weapons) जप्त केल्याने खळबळ उडाली होती. त्यातच, संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या स्फोटाच्या (Blast) बातमीने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.
या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याबद्दल आता मोठी चर्चा सुरू झाली असून तपास यंत्रणा या दिशेने कामाला लागल्या आहेत.
लाल किल्ल्याजवळ स्फोट
दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाला. या घटनेत अनेक लोक जखमी (Injured) झाले असून, आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट दहशतवादी कट (Terrorist Conspiracy) होता की, केवळ अपघात, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र, याच दिवशी सकाळी दिल्लीला हादरवून टाकण्यासाठी पुरेशी स्फोटकं फरीदाबादमध्ये सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
( नक्की वाचा : Delhi Blast : शक्तीशाली स्फोटानं लाल किल्ला हादरला! 'दहशतवादी अँगल'ची शक्यता? वाचा 10 मोठे मुद्दे )
जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे ऑपरेशन
सोमवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाईत (Anti-Terror Operation) मोठी सफलता मिळवली. त्यांनी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि अंसार गजवत-उल-हिंद (Ansar Ghazwat-ul-Hind) या प्रतिबंधित संघटनांशी संबंधित एका आंतर-राज्यीय आणि आंतरराष्ट्रीय मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir), हरियाणा (Haryana) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा (Ammunition) आणि स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांना या दहशतवादी कटाच्या नेटवर्ककडून मोठी स्फोटकं मिळाली आहेत.
एका भाड्याच्या घरातून 350 किलो स्फोटक आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली.
यानंतर, हरियाणाच्या फरीदाबादमधील दुसऱ्या एका घरातून सुमारे 2,563 किलो संशयित स्फोटके (Suspected Explosives) जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेला हा साठा राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसराला हादरवण्यासाठी पुरेसा होता.
प्राथमिक तपासानुसार, जप्त केलेला हा पदार्थ अमोनियम नायट्रेट (Ammonium Nitrate) असण्याची शक्यता आहे.
पुलवामा (Pulwama) येथील डॉक्टर मुजम्मिल शकील यांनी ही दोन्ही घरे भाड्याने घेतली होती. तो कट्टरपंथी व्यावसायिकांशी जोडलेल्या 'सफेदपोश' (White-collar) दहशतवाद्यांमधील एक महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक आणि दहशतवादी नेटवर्कचा खुलासा
या नेटवर्कमधील एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे:
#WATCH | Delhi: Delhi Police Commissioner Satish Golcha says, "Today at around 6.52 pm, a slow-moving vehicle stopped at the red light. An explosion happened in that vehicle, and due to the explosion, nearby vehicles were also damaged. All agencies, FSL, NIA, are here... Some… pic.twitter.com/uIt7NRziur
— ANI (@ANI) November 10, 2025
यातील डॉ. अदील अहमद राठेर याला 27 ऑक्टोबर रोजी सहारनपूर (Saharanpur), उत्तर प्रदेश येथून पकडण्यात आले होते. त्याच्या चौकशीत फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातील (Al-Falah University) प्राध्यापक डॉ. मुजम्मिल शकील याचा सहभाग उघड झाला आणि त्याला अटक करण्यात आली.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट आणि फरीदाबादमध्ये पकडलेल्या या प्रचंड स्फोटक साठ्यामुळे, तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून दोन्ही घटनांच्या संभाव्य संबंधाचा कसून तपास करत आहेत.
- आरिफ निसार डार उर्फ साहिल (नौगाम)
- यासिर-उल-अशरफ (नौगाम)
- मकसूद अहमद डार उर्फ शाहिद (नौगाम)
- मौलवी इरफान अहमद (इमाम, शोपियां)
- जमीर अहमद अहंगर उर्फ मुतलाशा (वाकुरा, गांदरबल)
- डॉ. मुजम्मिल अहमद गनई उर्फ मुसैब (पुलवामा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world