जाहिरात

Delhi blast: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट, मृतांचा आकडा वाढला, 24 जण जखमी

दिल्ली पोलीसांची स्पेशल टीम घटना स्थळी दाखल झाली आहे.

Delhi blast: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट,  मृतांचा आकडा वाढला, 24 जण जखमी
नवी दिल्ली:

दिल्लीतील लाल किल्ल्या जवळ मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट कारमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीसांची स्पेशल टीम घटना स्थळी दाखल झाली आहे. पावणे सात वाजता हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गजबजलेल्या या ठिकाणी मोठी धावपळ झाली. दरम्यान या ठिकाणी आता पोलीस पोहोचले असून पुढील तपास केला जात आहे. सहा वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला आहे.  या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर जवळपास 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

राजधानी दिल्ली स्फोटानं हादरली  आहे. एका बेवारस कारमध्ये हा स्फोट झाला आहे.  यात काही जण गंभीर जखमी झाले आहे. यात तीन गाड्यांना स्फोटामुळे आग लागली आहे.  लाल किल्ल्याजवळची घटना आहे.  मेट्रो स्टेशनच्या जवळ स्फोट झाला आहे. या संपूर्ण परिसरात आता नाकाबंदी करण्यात आली आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे.  या स्फोटात कारचे तुकडे तुकडे झाले आहेत. हा स्फोट ज्या कारमध्ये झाला ती बेवारस होती. ती एकाच ठिकाणी उभी असल्याचं ही समोर आलं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

स्फोटानंतर आता तिथे फॉरेन्सिक टीम ही पोहोचली आहे. शिवाय सादीकनगर पोलीसांची स्पेशल टीम तिथे पोहोचली आहे. स्फोटानंतर आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या ही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.  स्फोटामुळे गाड्यांचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. दिल्लीत स्फोट झाल्यानंतर मुंबईत तातडीने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

या हल्लानंतर दिल्लीतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  या स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने LNJP हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीने या भागात मोठा स्फोटाचा आवाज आल्याचं सांगितलं आहे. हा आवाज अतिशय भयंकर होता असं ही त्यांनी सांगितलं. तर एका स्थानिक दुकानदाराने आपण आपल्या आयुष्यात इतका मोठा आवाज कधीच ऐकला नव्हता असं सांगितलं आहे. आपण मरणार असं वाटलं होतं पण आपण वाचलो असं ही त्याने यावेळी सांगितलं. 

दिल्लीत लाल किल्ल्या जवळ ब्लास्ट झाल्यानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे गेट बंद करण्यात आले आहेत. लाल किल्ला येथील स्फोटाच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र सदनाचे गेट बंद केले आहे. पोलीसांनी दिल्लीचा ताबा घेतला घेतला आहे. तपासाला वेग आला आहे. संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यास्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

या स्फोटानंतर दिल्लीच्या बाजूच्या राज्यांनी रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड राज्यात पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.  पोलीसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीसांनी सतर्क रहावे असे आदेश सरकारने दिले आहेत. आज सकाळी पोलीसांनी दहशतवादी कारवायांचा डाव उधळवून लावला होता. त्याच्या काही अंतरावरच हा स्फोट झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com