- दिल्ली के लाल किले के पास भीषण कार धमाके का CCTV फुटेज सुरक्षा एजेंसियों के लिए महत्वपूर्ण सबूत बन गया है
- धमाका जैश-ए-मोहम्मद के संदिग्ध आतंकी डॉ. मोहम्मद उमर की i20 कार में हुआ था
- फुटेज में धमाके के समय लाल गुब्बारे जैसा एक जोरदार विस्फोट स्पष्ट रूप से देखा जा सकता है
Delhi Blast CCTV footage : नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार स्फोटाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तपासाच्या दृष्टीने हे सीसीटीव्हा फुटेज महत्ताचा पुरावा मानला जात आहे. हा स्फोट जैश-ए-मोहम्मदच्या संशयित दहशतवादी डॉ. मोहम्मद उमर यांच्या हुंडाई i20 कारमध्ये झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
चांदनी चौक येथील सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये रेकॉर्ड झालेल्या या फुटेजमध्ये स्फोटाच्या वेळी काय घडलं हे स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजनुसार, सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ अचानक जोरदार स्फोट झाला. चार विंडो असलेल्या या फुटेजमध्ये त्यावेळी परिसरात मोठी गर्दी दिसत होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात स्फोटाचा मोठा भडका उडाला.
(नक्की वाचा- Delhi Blast: डॉ. उमर मोहम्मद, आदिल अहमद... दिल्ली स्फोटातील 7 कनेक्शन; हादरवणारी INSIDE स्टोरी!)
पाहा VIDEO
सुरक्षा यंत्रणांनी या फुटेजच्या आधारे तपासाची गती वाढवली आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर दिल्लीसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनआयए आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world