Delhi Blast latest Update : राजधानी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, कारजवळ असलेल्या अनेक गाड्यांना आग लागली. जवळपास 5-6 कारचा चक्काचूर झाला असून या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 24 जण जखमी झाल्याचं समजते. या स्फोटामागे दहशतवाद्यांचं कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत याआधी किती स्फोट झाले होते? जाणून घ्या सविस्तर माहिती
ऑक्टोबर 2005 मध्ये सरोजिनी नगर, पहाडगंज बाजार आणि गोविंदपुरी बसमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 60 हून अधिक लोक ठार झाले होते. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. सप्टेंबर 2008 मध्ये कनाट प्लेस, गफ्फार मार्केट (करोल बाग) आणि ग्रेटर कैलाश (एम-ब्लॉक मार्केट) मध्ये झालेल्या स्फोटात 25 ते 30 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. तर सप्टेंबर 2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 5 वरही स्फोट झाला होता.
#WATCH | Delhi: Car parts seen strewn around due to the force of the blast
— ANI (@ANI) November 10, 2025
Multiple casualties have been brought to the LNJP hospital due to the blast near Gate No 1 of Red Fort Metro Station. Several people have been injured in the incident, sources tell ANI pic.twitter.com/UA8KDHqDTN
या स्फोटात 10 जण ठार झाले होते, तर 60 हून अधिक लोक जखमी झाले होते. मे 1996 मध्ये लाजपत नगर बाजारही स्फोटानं हादरलं होतं. या घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 लोक गंभीर जखमी झाले होते. जून 2000 मध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला होता, या स्फोटात 2 जण ठार झाले होते. तर 12 जण जखमी झाले होते. तसच मे 2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाबाहेरील कार पार्किंगमध्ये छोटा स्फोट झाला होता. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
1997 पासून राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची टाईमलाइन:
- 25 मे 2011: दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर कार पार्कमध्ये किरकोळ स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही.
- 27 सप्टेंबर 2008: महरौली फुलबाजारात कमी तीव्रतेच्या स्फोटात 3 जण ठार, 21 जखमी.
- 13 सप्टेंबर 2008: कनॉट प्लेस, करोल बागमधील घफ्फार मार्केट आणि ग्रेटर कैलाश-I मधील M-ब्लॉक मार्केटमध्ये 45 मिनिटांत 5 स्फोट; किमान 25 ठार, 100 हून अधिक जखमी.
- 14 एप्रिल 2006: जुनी दिल्लीतील जामा मशिदीच्या प्रांगणात दोन स्फोट; किमान 14 जण जखमी.
- 29 ऑक्टोबर 2005: सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी बसमध्ये तीन स्फोट; 59 ठार, 100 हून अधिक जखमी (परदेशी नागरिकांसह).
- 22 मे 2005: दोन चित्रपटगृहांमध्ये स्फोट; 1 ठार, 60 जखमी.
- 18 जून 2000: लाल किल्ल्याजवळ दोन शक्तिशाली स्फोट; 8 वर्षांची मुलगीसह 2 ठार, सुमारे 12 जखमी.
- 26 जुलै 1998: कश्मीरी गेट ISBT येथे बसमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट; 2 ठार, 3 जखमी.
- 30 डिसेंबर 1997: पंजाबी बागजवळ बसमध्ये स्फोट; 4 प्रवासी ठार, सुमारे 30 जखमी.
- 30 नोव्हेंबर 1997: लाल किल्ला परिसरात दोन स्फोट; 3 ठार, 70 जखमी.
- 26 ऑक्टोबर 1997: करोल बाग मार्केटमध्ये दोन स्फोट; 1 ठार, 34 जखमी.
- 18 ऑक्टोबर 1997: राणी बाग मार्केटमध्ये दोन स्फोट; 1 ठार, 23 जखमी.
- 10 ऑक्टोबर 1997: शांतिवन, कौरीया पूल आणि किंग्सवे कॅम्प परिसरात तीन स्फोट; 1 ठार, 16 जखमी.
- 1 ऑक्टोबर 1997: सदर बाजार परिसरात मिरवणुकीजवळ दोन स्फोट; 30 जखमी.
- 9 जानेवारी 1997: ITO येथील दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर स्फोट; 50 जखमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world