
Earthquake in Delhi : देशाची राजधानी नवी दिल्ली सोमवारी पहाटे शक्तीशाली भूकंपाने हादरली. दिल्लीकर साखरझोपेत असताना धरणी कंपनाने त्यांचा पळापळ झाली. दिल्लीत झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. हादरे बसल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पळ काढत मोकळ्या जागी आसरा घेतला. भूकंपासोबतच जोरदार आवाजही झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
Earthquake of Magnitude 4.0 hits Delhi-NCR
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2025
Read @ANI Story | https://t.co/JDCN8raTtc#NewDelhi #Earthquake #NationalCenterforSeismology pic.twitter.com/pzYV5hQYv8
सोमवारी पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घाबरून जागे झाले आणि घराबाहेर पळाले. दिल्ली, नोएडा, फरीदाबाद, गुडगाव, गाझियाबाद येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. प्रत्येकाला शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन आहे. तसेच संभाव्य आफ्टरशॉकसाठी सतर्क राहावे. अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत."
Tremors were felt in Delhi and nearby areas. Urging everyone to stay calm and follow safety precautions, staying alert for possible aftershocks. Authorities are keeping a close watch on the situation.
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2025
एका नागरिकांने भूकंपाचा अनुभव सांगताना म्हटलं की, "जमिनीखाली काहीतरी तुटत असल्यासारखे वाटले. जमीन तुटण्याच्या आवाजाने हादरत होती. जीव वाचवण्यासाठी कुटुंबासह थेट घराबाहेर पळत सुटलो. घराबाहेर पडून बरेच लोक बाहेर उभे होते. सगळे घाबरले होते."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world