अखेर नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार हे निश्चित झालं आहे. दिल्लीत पुन्हा महिला राज आलं असून भाजपच्या रेखा गुप्ता यांचा आज रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहे.
दिल्लीत मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर
दिल्लीत मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्याकडे अर्थ विभाग ठेवला आहे. तर प्रवेश वर्मा यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात एकूण सहा मंत्री आहेत.
मनसेच्या शाखाध्यक्षांचं प्रगती पुस्तक दर पंधरा दिवसांनी तपासलं जाणार
मनसेच्या शाखाध्यक्षांचं प्रगती पुस्तक दर पंधरा दिवसांनी तपासलं जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेने सावध पवित्रा घेतला आहे. मनसेचे कामकाज तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. पक्ष वाढीसाठी शाखाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शाखाध्यक्षांच्या कामावर पक्षाची आता बारीक नजर असणार आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेतला गेला.
टीम इंडियासमोर विजयासाठी 229 रन्सचं आव्हान, शमीच्या 5 विकेट्स
भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करताना बांगलादेशची टीम 228 रन्सवरच ऑल आऊट झाली. बांगलादेशकडून तौहीद ह्रदोयनं सेंच्युरी झळकावली. तो 100 रन काढून आऊट झाला. त्याला जाकेर अलीनं (68) चांगली साथ दिली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणाला 3 तर अक्षर पटेलला 2 विकेट्स मिळाल्या.
Live Update : अंजली दमानियांविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू - धनंजय मुंडे
स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, असं धनंजय मुंडे म्हणाले. अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले असून अंजली दमानिया यांच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले आहे.
Live Update : गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करा, अमरावतीत संघटनांचं धरणे आंदोलन
ज्येष्ठ कम्युनिस्ट, कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून खून करणाऱ्या सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करून गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष संघटनाचे वतीने करण्यात आली आहे, याबाबत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगा बाहेर आले तर खटल्यातील साक्षीदारावर दबाव आणू शकतात त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.
Live Update : कुंभेरी नदी पात्राला जलपर्णीचा वेढा, महाशिवरात्री पूर्वी साफसफाईची नागरिकांची मागणी...
भिवंडी तालुक्यातील पडघ्या जवळून वाहणारी कुंभेरी नदी. या नदीच्या तीरावर मुंबई - नाशिक महामार्गावर खडवली फाट्याजवळ पुरातन असं शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच या शिवमंदिरात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत असते या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक-भक्त येथे येऊन या नदीच्या पात्रात स्नान करत असतात. परंतु सध्या या नदी पात्रात पाण्यावर जलपर्णीचा थर तयार झाल्याने पाणी दुषीत झालयं. यामुळं महाशिवरात्री काळात येणाऱ्या शिव भक्तांना स्नान करण्यास अडचण निर्माण होणार आहे. या कारणास्तव प्रशासनाकडून तात्काळ कुंभेरी नदीपात्रातील जलपर्णी काढावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
Live Update : बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया करणार पहिल्यांदा बॉलिंग, पाहा Playing 11
Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतोनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियानं कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या अनुभवी बॉलर्सना संधी दिली आहे.
टीम इंडियाची Playing 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि मोहम्मद शमी
Live Update : 22 फेब्रुवारीपासून आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात
आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा शनिवारी 22 फेब्रुवारीला संपन्न होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व उपाययोजना संदर्भात अधिकारी व आंगणेवाडीतील ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगत जे व्हीआयपी वायूमार्गाने येणार आहेत त्यांच्यासाठी तीन हेलिपॅड तयार करण्यात आल्याचं सांगितल. तसेच प्रोटोकॉलनुसार त्यांच्या सुरक्षेची दक्षता पोलीस विभागाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती ही सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
उपमुख्यमंत्री शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे
जे जे मार्ग आणि मंत्रालय पोलीस ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आला आहे.
पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे
Live Update : शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, हिंदू जनजागरण समितीची मागणी
शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, हिंदू जनजागरण समितीची मागणी
महाराजांचा जर एकेरी उल्लेख असेल तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण करायला काही हरकत नाही
या मागणीला आमचा पाठिंबा असल्यचं शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं.
छावा चित्रपट पाहण्यासाठी घोड्यावरून अवतरले छत्रपती संभाजी महाराज
पुण्यातील महिलांनी फेटे बांधून बघितला छावा चित्रपट
लाल महालापासून वाजत गाजत छत्रपती संभाजी महाराज घोड्यावरून आले चित्रपटगृहात
महिलांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमून सोडला चित्रपटगृह
पुण्यातील मनसेने नेते प्रल्हाद गवळी यांनी आयोजित केला होता महिलांसाठी विशेष प्रयोग
पेण तालुक्यातील तिलोरे तर सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई भोप्याची वाडी, कवेले वाडी, येथे भूगर्भातील आवाज येऊन पहाटे तीन वाजता जमीन हादरली. असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला. यानंतर सुधागड तालुक्यातील पाली मधील तहसीलदार यांनी पहाटे घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी करून येथील ग्रामस्थांची माहिती घेतली.
या धक्क्यात अद्याप कोणतेही नुकसान झाले नसले तरी लोकांना काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या.
लवकरच भूगर्भ तज्ज्ञकडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
पेणचे तलाठी आणि पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनीही या ठिकाणी भेट दिली.
Live Update : गजानन महाराजांच्या 147 वा प्रगट दिन सोहळ्याचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी...
विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा 147 वा प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात शेगावतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय... आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविक श्रीचरणी नतमस्तक झाले आहे.संस्थांच्या वतीने मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज गुरुवारी श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा निघणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झालेले आहेत.
Live Update : दौंड येथील तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील 37 वर्षीय सागर प्रल्हाद काची याचे 17 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 2 वाजता ससून जनरल हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. त्यांना 10 फेब्रुवारी 2025 रोजी गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणं आढळून आल्याने दाखल करण्यात आले होते. इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन थेरपी आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट मिळाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली, ज्यामुळे श्वसनक्रिया बंद पडली आणि 17 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं.
Live Update : कल्याणमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीवार, एकाचा मृत्य
कल्याण पूर्व येथील नाना पावशे चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे.
रणजित दुबे नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू
चुलत भावाने गोळीबार केल्याची कोळशेवाडी पोलिसांची प्राथमिक माहिती
उत्तरप्रदेशात जागेच्या वादातून सुरू होता वाद
आरोपीच्या शोधात पोलीस
Live Update : कारची शर्यत लावणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांविरोधात नागपूर पोलिसांची कारवाई
नागपूर पोलिसांनी कारची शर्यत लावणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणात नागपूरच्या विविध परिसरातून पाच कार जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात, वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कारची शर्यत लावली होती. या शर्यतींचे व्हिडिओ विद्यार्थ्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केले, त्यानंतर हे रिल्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले
Live Update : आरोग्य मित्राच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील तसेच इतर राज्यातील गोर गरीब जनतेला (रुग्णांना) केंद्र शासन तसेच राज्य शासन जाहीर योजनेतून जवळपास १३५६ प्रकारच्या आजारावर मोफत उपचारासाठी 5 लाखापर्यंतचा खर्च हा मोफत केला जातोय.. मात्र आता आजपर्यंत आरोग्यमित्र तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यामुळे आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने मानधन वाढ व्हावी, यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला.
Live Update : आज गजानन महाराज प्रकट दिन, अकोल्यातून हजारो भक्तगण विदर्भाची पंढरी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला
आज गजानन महाराज प्रकट दिन, अकोल्यातून हजारो भक्तगण विदर्भाची पंढरी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला