जाहिरात

Dog Attack: 'या' राज्यात भटके कुत्रे चावण्याची एकही नाही घटना, पण महाराष्ट्राचे आकडे थरकाप उडवणारे

या घटना रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

Dog Attack: 'या' राज्यात भटके कुत्रे चावण्याची एकही नाही घटना, पण महाराष्ट्राचे आकडे थरकाप उडवणारे
  • देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
  • महाराष्ट्रात कुत्रा चावण्याच्या घटनांची सर्वाधिक संख्या आहे.
  • लहान मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये सर्वाधिक धोका आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेली दहशत आता सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने शाळा आणि रुग्णालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वावराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शिवाय या ठिकाणी भटके कुत्रे लहान मुलांना टार्गेट करत असल्याचं ही समोर आलं आहे. त्यात अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षातले कुत्र्याच्या हल्ल्याचे आकडे ही समोर आले आहेत. ते हादरवून सोडणारे आहेत.  

15 वर्षांखालील 5 लाखाहून अधिक मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुसरीकडे लक्षद्वीप सारख्या ठिकाणी एकही केस नसणे, हे आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. केंद्र सरकारने इतर प्राण्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही लोकसभेत मांडली आहे. आता सर्वोच्च न्यायालय यावर काय मार्गदर्शक तत्वे जाहीर करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - D Mart News:डी मार्टचा जानेवारी धमाका! काय आहेत विशेष ऑफर?, ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊस

पीआयबीने (PIB) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये देशभरात कुत्रा चावण्याच्या 37लाख 15 हजार 713 घटनांची नोंद झाली आहे. 2023 च्या तुलनेत (30,52,521 प्रकरणे) यामध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात 21 लाख 95 हजार 122 जणांना कुत्र्यांनी लक्ष्य केले असून, त्यापैकी 37 जणांचा मृत्यू झाला आहे. कुत्र्यांचे वाढणारे हल्ले हे चिंताजनक समजले जात आहे. या घटना रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?

देशात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या असून, येथे 4 लाख 85 हजार 345 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागतो. लक्षद्वीप हे एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे जिथे एकही घटना नोंदवली गेलेली नाही. लहान मुले या समस्येचा सर्वाधिक बळी ठरत असून, 15 वर्षांखालील सुमारे 5,19,704 मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली आहे. मत्स्यपालन आणि पशुपालन मंत्री ललन सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, केवळ ग्रामीण भागातच कुत्र्यांच्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. 

नक्की वाचा - Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार' यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com