जाहिरात
2 days ago

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काल 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता अनुयायांनी स्थानिक बुद्ध विहारांमध्ये मोठी गर्दी केली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरात त्रैलोक्य बौद्ध महासंघ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी सलग 18 तास अभ्यास करत आहे. बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करत आहेत. यंदा या उपक्रमाचे 20 वे वर्ष असून 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे

LIVE Updates: वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकाला फटका

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पारगाव सुद्रिक परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन केलं जातं. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे इथल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर द्राक्ष बागातदार गणेश जगताप यांच्या द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त झाला आहे. जगताप यांना दहा एकर द्राक्ष शेती असून तीन एकर बागेचं नुकसान झाल आहे. अक्षरशा बाग भुईसपाट झाला आहे. त्यामुळे तब्बल तीस ते पस्तीस लाखांचं आर्थिक नुकसान जगताप यांचा झाला आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केले आहे.

Mumbai News: मुंबईतील टँकर चालकांचा संप मागे, थोड्याच वेळात घोषणा होणार

मुंबईतील टँकर चालकांचा संप मागे 

औपचारिक घोषणा बाकी 

थोड्याच वेळात संप मागे घेतल्याचे जाहीर करणार 

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जाणार नसल्याचं संघटनेला आश्वासन 

यानंतर टँकर चालक संघटना त्यांच्या मागण्यांसाठी सुप्रीम कोर्टात जाणार

LIVE Updates: छगन भुजबळांनी येवला मुक्ती भूमीला दिली भेट

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील मुक्तीभूमीवर भेट देत तेथील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत त्यांना अभिवादन केले यावेळी त्यांच्या सोबत आमदार पंकज भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ हे उपस्थित होते,डॉ बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आज आपल्याला अधिकार मिळाले असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Nashik News: नाशिकच्या पांडवलेणी खून प्रकरणातील तिघं संशयित आरोपी आणि एक विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात

- नाशिकच्या पांडवलेणी खून प्रकरणातील तिघं संशयित आरोपी आणि एक विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात...

- गुन्हे शोध पथक एकची कामगिरी, अवघ्या काही तासात फरार संशयितास केले जेरबंद...

- काल रात्री पांडवलेणी येथे मद्यधुंद टोळक्याने राम बोराडे आणि राजेश बोराडेयांच्यावर केला होता धारदार शस्त्राने हल्ला...

- इंदिरा पोलीस ठाण्यात आठ जणांनवर गुन्हा दाखल, इतर अद्याप फरार...

- हल्ल्यातील संशयतांची कसून चौकशी सुरू, इतर फरार संशयतांना लवकरच ताब्यात घेणार -

-  नाशिक पोलीस...

Live Update : जळगाव जिल्ह्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका बसला आहे. केळी मका कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रावेर तालुक्यात 500 हेक्टर वर तर चोपडा तालुक्यात सुमारे 300 हेक्टरवर पिकांची नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील आंबा महोत्सवाला राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट देणार

आंबा महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती

३० एप्रिलला नवीन महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सव…

आंबा महोत्सवात कोकणातील हापूस आंबा दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिला जाणार…

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी आंबा महोत्सवांचे आयोजन केलं आहे.

आंबा महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

Live Update : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

वरळी परिवहन विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकी

सलमानला घरात घुसून मारण्याची धमकी

मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Live Update : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टी गजबजली

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टी गजबजली

हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात 

समुद्रात मनसोक्त डुंबण्याकडे, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्याकडे पर्यटकांचा ओढा 

गेले चार दिवस रत्नागिरीतील दापोली, वेळास, कर्दे, हर्णे, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, आरे वारे, गणपतीपुळे समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक 

लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यातच पर्यटन हंगामाला सुरुवात 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर लगतची हॉटेल्स हाउसफुल 

यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या कोकणातील किनारपट्टी भागात घालवण्याचा ट्रेंड 

सध्या मुंबई पुणे नागपूर या भागातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाकडे 

Live Update : मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बोलवली टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची बैठक

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बोलवली टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची बैठक 

टँकर चालकाच्या शिस्त मंडळांना तातडीने भूषण गगराणी यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवले आहे 

दहा वाजताच्या सुमारास टँकर चालकांचे पाच जणांचे शिष्टमंडळ भूषण गगराणी यांची भेट घेणार. 

मुंबई महानगरपालिकेने लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा या सोबतच टँकर तालकांचा चिघळलेला संप यावर बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता

Live Update : इंदापूर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी मनोज मोरे यांची निवड

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या इंदापूर अर्बन सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी मनोज मोरे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंदापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष पद हे रिक्त होते.

Live Update : पीएनबी बँक घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक

पीएनबी बँक घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक

Live Update : उमरेड MIDC पाच कामगार मृत्यू प्रकरणात 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका

उमरेड तालुक्यातील एमआयडीसीतील एमएमपी कंपनीतील भीषण स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी आहेत. यामध्ये कंपनीतील तीन अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Live Update : मावळ तालुक्यातील वन्य परिक्षेत्रात वन्यजीवांसाठी 31 पाणवठे तयार

मावळ तालुक्यातील वन्य परिक्षेत्रात वन्यजीवांसाठी ऐन उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेत, वनपरिक्षेत्रात जवळपास 31 पाणवठे तयार करण्यात आलेत.

Live Update : वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात भीषण पाणीटंचाई

वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात असलेल्या चामला गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 464 लोकसंख्या असलेल्या गावांत पाण्याचे स्रोत आटल्याने येथील नागरिकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. 

Live Update : मनमाड शहरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असतांनाच नाशिकच्या मनमाड शहरातही जयंतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मध्यरात्री डॉ. आंबेडकरांना अभिवादन  करण्यासाठी अवघा निळा सागर लोटला होता.