
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारताचा सर्वात अॅडव्हान्स कम्युनिकेशन सॅटलाईट GSAT-20 चं यशस्वीरित्या प्रक्षेपण झालं. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे GSAT-20 चे अंतराळात प्रक्षेपण झालं आहे. मंगळवारी मध्यरात्री ही सॅटलाईन दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा आणि उड्डाणांमध्ये प्रवाशांना इंटरनेट सेवा प्रदान करेल.
इस्रोची बंगळुरूमधील कमर्शियल ब्रान्च न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन दुराईराज यांनी NDTV ला सांगितले की, सॅटलाईटचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. GSAT 20 ला अचूक कक्षा मिळाली आहे. GSAT N-2 किंवा GSAT 20 नावाचा 4,700 किलो वजनाचा पूर्णपणे कमर्शियल सॅटलाईट केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथील स्पेस कॉम्प्लेक्स 40 येथून प्रक्षेपित करण्यात आला.
(नक्की वाचा- बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेत मुसक्या आवळल्या)
🚨 ISRO's GSAT-20 Launched by SpaceX.
— Indian Trend 𝕏 (@IndianTrendX) November 19, 2024
The GSAT-20 satellite lifted off aboard SpaceX's Falcon 9 rocket from Cape Canaveral Space Force Base, Florida.
This marks the first ISRO spacecraft launched on a US rocket since 1990, following INSAT-1D.#ISRO #SpaceX pic.twitter.com/49oTK9h62f
GSAT-20 चे मिशनचे आयुष्य 14 वर्षे
प्रक्षेपणाच्या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटलं की, "GSAT-20 मिशनचे आयुष्य 14 वर्षे असणार आहे. जमिनीवरील पायाभूत सुविधा देण्यासाठी सॅटलाईट सज्ज आहे.
(नक्की वाचा- 'निवृत्ती घ्या किंवा बदली करुन घ्या', गैर हिंदू कर्मचाऱ्यांसाठी तिरुमला मंदिर प्रशासनाचे निर्देश)
बंगळुरूमधील यूआर राव सॅटेलाइट सेंटरमधून एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी लिफ्ट ऑफचे निरीक्षण केले. डॉ.सोमनाथ यांनी पुढे म्हटलं की, हे प्रक्षेपण यशस्वी झाले कारण आम्हाला चांगली कक्षा मिळाली. इस्रोच्या कमर्शियल ब्रान्च न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) द्वारे स्पेसएक्स रॉकेटवर सॅटलाईट प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world