जाहिरात

'निवृत्ती घ्या किंवा बदली करुन घ्या', गैर हिंदू कर्मचाऱ्यांसाठी तिरुमला मंदिर प्रशासनाचे निर्देश

TTD चा हा निर्णय घटनेच्या कलम 16(5) वर आधारित आहे. जे धार्मिक किंवा सांप्रदायिक स्वरूपाच्या संस्थांना त्यांच्या धर्माच्या सदस्यांना नियुक्त करण्याची परवानगी देते.

'निवृत्ती घ्या किंवा बदली करुन घ्या', गैर हिंदू कर्मचाऱ्यांसाठी तिरुमला मंदिर प्रशासनाचे निर्देश

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील नव्याने स्थापन झालेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांसाठी एक ठराव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार, मंदिर मंडळात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेणे किंवा आंध्र प्रदेशातील अन्य सरकारी विभागात बदली करणे यापैकी एक निवडावे लागणार आहे. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मंदिरातील पवित्र प्रसादात भेसळ होत असल्याच्या बातम्यांवरून बराच गदारोळ झाला होता.

टीटीडी ही एक स्वतंत्र सरकारी ट्रस्ट आहे. जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराचे हे व्यवस्थापन करते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीटीडी कायद्यात अलीकडच्या काळात तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. मंदिर मंडळ आणि त्याच्याशी संलग्न संस्थांनी केवळ हिंदूंनाच काम दिले पाहिजे अशी अट घालण्याचा त्याचा उद्देश होता. 1989 मध्ये जारी केलेल्या आदेशात असेही म्हटले होते की टीटीडी-प्रशासित पदांवर नियुक्त्या हिंदूंसाठी मर्यादित असतील. 

(नक्की वाचा-  बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेत मुसक्या आवळल्या)

तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) चे नवीन अध्यक्ष बीआर नायडू यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे. मात्र, मंदिर मंडळात काम करणाऱ्या अहिंदू कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीटीडीच्या नव्या निर्णयामुळे बोर्डाच्या 7,000 कायम कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 300 कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. TTD मध्ये 14,000 कंत्राटी कर्मचारी देखील काम करतात.

(नक्की वाचा:'...तर मी उद्या अर्ज मागे घेणार', सांगता सभेतून दिलीप वळसेंचे मोठं चॅलेंज)

TTD चा हा निर्णय घटनेच्या कलम 16(5) वर आधारित आहे. जे धार्मिक किंवा सांप्रदायिक स्वरूपाच्या संस्थांना त्यांच्या धर्माच्या सदस्यांना नियुक्त करण्याची परवानगी देते. पूर्वीच्या YSRCP सरकारने मंदिराच्या लाडू प्रसादाच्या तयारीमध्ये भेसळयुक्त तूप वापरण्याची परवानगी दिल्याचा नायडूंच्या सरकारने आरोप केल्यानंतर लगेचच TTD चा निर्णय आला. या दाव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com