
कोणता व्यक्ती काय करेल याचा काही नेम नाही. कोणाच्या मनात एकादी संकल्पना येते आणि ती प्रत्यक्षातही आणली जाते. असाच एक लोकांनी आश्चर्य चकीत करणारा प्रकार बिहीरमधील गयाजी जिल्ह्यात घटला आहे. इथं एका निवृत्त जवानाने जिवंतच असताना आपली अंत्ययात्रा काढली. त्याच सर्व खर्च ही त्यांनी केला. शिवाय अंत्ययात्रेसाठी लोकांना बोलावलं ही गेलं. वाजत गाजत ही अंत्ययात्र स्मशानभूमीत ही नेण्यात आली. पण त्यांनी हे असं का केलं याची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. त्या मागचं कारण ही या निवृत्त सेना जवानाने सांगितलं. त्यानंतर सर्वच जण अचंबित झाले.
बिहारमधील गयाजी जिल्ह्यात शनिवारी एक अत्यंत अनोखी आणि विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. एका माजी वायुसेना जवानाने जीवंत असतानाच स्वतःची 'अंतिम यात्रा' काढली. हा आपला 'मृत्यू उत्सव' असल्याचे सांगत त्याने तो साजरा ही केला. ही अंत्ययात्रा बँडबाजासह निघाली. त्यात लोकं 'राम नाम सत्य आहे हे बोलत होते. फुलांनी सजलेल्या अर्थीवर (तिरडीवर) झोपून थेट त्यांना मुक्तिधामावर नेण्यात आले. यावेळी 'चल उड जा रे पंछी, अब देश हुआ बेगाना' ही धून वाजवली जात होती.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
गयाजी जिल्ह्यातील गुरारू ब्लॉकमधील कोंची गावातील हे मोहनलाल नावाचे माजी जवान आहेत. त्यांच्या या अनोख्या कृतीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शेकडो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मुक्तिधामवर पोहोचल्यावर त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला. शिवाय सामूहिक प्रीतिभोज आयोजित केले होते. यामागील आपला उद्देश स्पष्ट करताना मोहनलाल म्हणाले की, "माझ्या अंत्ययात्रेत कोण कोण सहभागी होते हे दृश्य मला स्वतःला बघायचे होते." लोक त्यांना किती आदर आणि प्रेम देतात, हे त्यांना जीवंतपणी जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी जीवंत पणी आपली अंत्ययात्रा काढली.
मोहनलाल यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले आहे. पावसाळ्यात शवदानात होणारी अडचण पाहून त्यांनी स्वत:च्या खर्चातून गावात सुविधांनी युक्त मुक्तिधाम (स्मशानभूमी) बांधले आहे. त्यांचे हे कार्य परिसरातील लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. मोहनलाल यांना 2 मुलं आहे. डॉ. दीपक कुमार आणि विश्व प्रकाश असं त्याचं नाव आहे. तर 1 मुलगी आहे तिचं नाव गुड़िया कुमारी आहे. त्यांच्या पत्नी, जीवन ज्योती, यांचे 14 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या आजच्या कृतीची चर्चा सर्वत्र होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world