
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने याचं कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं. आज 7 मे रोजी पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढविण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानकडून वारंवार कुरघोडी सुरू आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचं पालन पोषण केलं जात असल्याचं पुरावे याआधीही समोर आले आहेत. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तानस्थिती लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे.
नक्की वाचा - Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर फत्ते; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी प्रतिक्रिया
या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. 'पिक्चर अभी बाकी है!' अशा आशयाचं नरावणे यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे यापुढे दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जाऊ शकते. काही तज्ज्ञांनुसार ऑपरेशन सिंदूर ही दहशतवाद संपविण्याची सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे.
Abhi picture baki hai…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025
पहलगाम हल्ल्याविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराे एलओसीवर गोळीबार सुरू केला. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर भागातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला. ज्यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले, अशीही माहिती लष्कराने दिली आहे. त्यामुळे यापुढेही पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यावर भारत दुपटीने प्रत्युत्तर देईल असं चित्र आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world