जाहिरात

Gautam Adani : 'हम करते दिखाते है', गौतम अदाणींकडून 'अदाणीयन्स'च्या पाठीवर कौतुकाची थाप

अदाणी समूहाचा भाग असलेल्या नूरजहाँ आणि केय यांची भेट घेत गौतम अदाणी यांनी दोघांनाही कौतुकाची थाप दिली. 'हम करते दिखाते है' म्हणत गौतम अदाणी नूरजहाँ आणि केय यांच्या कारगिरीचा गौरव केला. 

Gautam Adani : 'हम करते दिखाते है', गौतम अदाणींकडून 'अदाणीयन्स'च्या पाठीवर कौतुकाची थाप

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी टेबल टेनिस खेळाडू नूरजहाँ जमानी आणि धाडसी बंजी जम्पिंग करणारे केय मेहता यांचं अभिनंदन केलं आहे. अदाणी समूहाचा भाग असलेल्या नूरजहाँ आणि केय यांची भेट घेत गौतम अदाणी यांनी दोघांनाही कौतुकाची थाप दिली. 'हम करके दिखाते है' म्हणत गौतम अदाणी यांनी नूरजहाँ आणि केय यांच्या कामगिरीचा गौरव केला. 

नूरजहाँ यांनी टेबल टेनिस राष्ट्रीय पॅरा टीटी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्या अदाणी एअरपोर्ट्सच्या कर्मचारी आहे. 

गौतम अदाणी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "'अदाणी' समूहातील आणखी एक अविश्वसनीय आठवडा! अदाणी विमानतळाच्या कर्मचारी नूरजहाँ जमानी यांचे खूप खूप अभिनंदन! यूटीटी राष्ट्रीय पॅरा टीटी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, त्यानंतर राष्ट्रीय पॅरा टीटी 2024-25 मध्ये आणखी एक सुवर्णपदक (महिला एकेरी – क्लास 6), रौप्यपदक (मिश्र दुहेरी) आणि कांस्यपदक (महिला दुहेरी)." 

"ही असाधारण कामगिरी आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे! तसेच माझ्यासोबत आहेत आमच्या 'बिझडेव्ह' टीममधील एक निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि बंजी चॅम्पियन केय मेहता. भरारी तेच घेऊ शकतात, जे आकाश कवेत घेण्याची जिद्द ठेवतात... Hum Karke Dikhate Hain!", असं ट्वीट गौतम अदाणी यांनी केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: