जाहिरात

Ujani Dam : पावसाळ्यापूर्वीच उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, अवघ्या 3 दिवसात मोठी वाढ

गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिली तर उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते.

Ujani Dam : पावसाळ्यापूर्वीच उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, अवघ्या 3 दिवसात मोठी वाढ

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगरसाठी जीवनदायीनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 1 पूर्णांक 89 टीएमसी इतकी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस 19.पूर्णांक 43 टक्के इतका आहे. मायनसमध्ये असलेलं उजनी धरण प्लस मध्ये येण्यासाठी आणखी 10 पूर्णांक 41 टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे. 

EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती

नक्की वाचा - EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती

सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला आहे. मात्र सद्यस्थितीला उजनी धरणात येणारा विसर्ग हा शून्य आहे. 6 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तत्पूर्वी सद्य परिस्थिती पाहता मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात सर्वच भागात अवकाळी पावसाने जोर धरलेला आहे. यात पिकांचा देखील काही ठिकाणी मोठ नुकसान झालेला आहे.

जर मान्सून पुढील दहा दिवसात महाराष्ट्रात दाखल झाला तर पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे एकंदरीत पुढील आठवड्याभरात अशीच परिस्थिती राहिली तर उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुरू होऊ शकते आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढू शकते शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com