जाहिरात

MP News: रात्रभर गारठलं, रड रड रडलं... 3 दिवसांच्या बाळाला पालकांनी जंगलात सोडलं; कारण...

Madhya Pradesh News : तीन दिवसांच्या बाळाने जंगलातील गारठ्यात आणि उघड्यावर अख्खी रात्र काढली. तिथे त्याच्या अंगावर मुंग्या देखील चढल्या होत्या.

MP News: रात्रभर गारठलं, रड रड रडलं... 3 दिवसांच्या बाळाला पालकांनी जंगलात सोडलं; कारण...
  • Newborn in Madhya Pradesh was left under a stone and survived three days in the forest
  • Parents abandoned the baby fearing job loss due to government rules on family size
  • Doctors confirmed the baby suffered ant bites and hypothermia but is now stable
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक अत्यंत हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका सरकारी शिक्षक दांपत्याने आपल्या तीन दिवसांच्या बाळाला जंगलात दगडाखाली दाबून मरण्यासाठी सोडले. परंतु, बाळाने गारठ्याशी आणि मुंग्यांशी झुंज देत चमत्कारिकरीत्या जीव वाचवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागील कारण नोकरी गमावण्याची भीती हे आहे.

बाळाचे वडील बबलू दांडोलिया सरकारी शिक्षक आहे, तर आईचं नाव राजकुमारी दांडोलिया आहे. सरकारी नियमांनुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीला नोकरीत अडचणी येऊ शकतात. या भीतीपोटी दांडोलिया दांपत्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांना आधीच तीन मुले असल्यामुळे, त्यांनी चौथी गर्भधारणा गुप्त ठेवली होती. 23 सप्टेंबरच्या पहाटे राजकुमारीने घरी बाळाला जन्म दिला. मात्र काही तासातच या दाम्पत्यांना आपल्या बाळाला नंदनवाडी जंगलात नेऊन सोडलं.

रात्रभर थंडीत कुडकुडत राहिलं बाळ

तीन दिवसांच्या बाळाने जंगलातील गारठ्यात आणि उघड्यावर अख्खी रात्र काढली. तिथे त्याच्या अंगावर मुंग्या देखील चढल्या होत्या. पहाटे नंदनवाडी गावातील ग्रामस्थ जंगलात फिरण्यासाठी गेले असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुरुवातीला हा कुठल्या प्राण्याचा आवाज असावा, असे त्यांना वाटले. पण जवळ गेल्यावर त्यांना दगडाखाली एक लहान हात धडपडत असल्याचे दिसले.

ग्रामस्थांनी दगड बाजूला केल्यावर रक्ताने माखलेले आणि थंडीने कुडकुडणारे बाळ जिवंत आढळले. गावकऱ्यांना तातडीने याबाबत पोलिसांना कळवले आणि छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात बाळाला दाखल केले. बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की, बाळाच्या शरीरावर मुंग्या चावल्याच्या खुणा आणि हायपोथर्मियाची लक्षणे होती. 'रात्रभर अशा स्थितीत राहिल्यानंतरही बाळ वाचले, हा चमत्कारापेक्षा कमी नाही', असे डॉक्टरांनी नमूद केले. बाळ सध्या सुरक्षित असून वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिसांनी या घटनेची तात्काळ नोंद घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदेशीर तपासणीनंतर कलम 109 BNS (हत्येचा प्रयत्न ) देखील जोडला जाण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com