जाहिरात

Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली

Husband vs Wife Clash Viral Video :   सध्याच्या घडीला वर्क-लाईफ बॅलेन्स करणं म्हणजे काम आणि पर्सनल लाईफचं समीकरण व्यवस्थित जुळवणं अनेकांसाठी तारेवरची कसरत असते. सोशल मीडियावर पती-पत्नीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली
Husband And Wife Fight Video Viral
मुंबई:

Husband vs Wife Clash Viral Video :   सध्याच्या घडीला वर्क-लाईफ बॅलेन्स करणं म्हणजे काम आणि पर्सनल लाईफचं समीकरण व्यवस्थित जुळवणं अनेकांसाठी तारेवरची कसरत असते. सोशल मीडियावर पती-पत्नीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात घर आणि ऑफिसचं काम सांभाळताना लोकांची कशाप्रकारे तारंबळ उडते, तसच पती घरी उशिरा पोहोचल्यावर पत्नी पतीवर भडकते, अशा अनेक अनेक घटना समोर आल्या आहेत. या व्हिडीओतही पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

72 तासांची ड्युटी करून थकलेल्या अवस्थेत एक पती घरी पोहोचला होता. त्याचदरम्यान समोर असलेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीवर प्रश्नांची सरबत्तीच केली.तुम्हाला संसारासाठी कधी वेळ मिळेल? असा प्रश्न पत्नीने पतीला विचारला अन् पुढं जे काही घडलं, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. पत्नी-पत्नीमध्ये झालेला वादच नाही, तर ही एक प्रत्येक कुटुंबाची कहाणी आहे, जे लोक नोकरी आणि पर्सनल लाईफ यांच्यात अडकले आहेत.

नक्की वाचा >> डिलिव्हरी बॉयने केलं मोठं कांड! बिल्डिंगमध्ये पार्सल देताना तरुणीच्या छातीला हात लावला अन्..CCTV Video व्हायरल

आजची स्थिती अशी आहे, जिथे काम संपत नाही. पण वेळ नेहमीच संपतो. हा व्हिडीओ याच परिस्थितीचं एक उदाहरण आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.पत्नीने पतीला सुनावल्याचा या व्हिडीओची इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. @venom1s या एक्स यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.पती रेल्वेत काम करतो आणि 72 तासांची ड्युटी करून तो घरी परततो,असा दावा केला जात आहे. त्यानंतर पत्नीचा रागावते आणि पतीची चांगलीच शाळा घेते, असं या व्हिडीओत दिसत आहे.

इथे पाहा पती-पत्नीचा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओत पाहू शकता की, पत्नी पतीला म्हणते, तुम्ही आले..16 तास घरी देत जा, 72 तास रेल्वेला देता..पूर्ण दिवसं घरचं काम मीच करते. तुम्ही कुटुंबाला वेळच देत नाहीत, असं म्हणत पत्नी पतीवर नाराज होते. पण थकलेल्या अवस्थेत असलेला पती शांतच राहतो. तो पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे.एका यूजरने म्हटलंय, त्याच्या डोळ्यांमध्ये थकवा स्पष्ट दिसतोय. तो व्यक्ती पूर्णपणे तुटला आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं, तो यासाठी गप्प आहे, कारण त्याने आधीही अशाप्रकारची भांडणं पाहिली आहेत. 

नक्की वाचा >> Dhule News : धुळे शहरात खळबळ! डॉगेश भाईंच्या गँगचा अचानक झाला मृत्यू, 12 श्वानांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com