जाहिरात

ऐकावे ते नवलच! थंडीमुळे भर मांडवात लग्न मोडलं, तरुण बेशुद्ध झाला; नववधू भडकली

Jharkhand Wedding News: थंडीच्या कारणामुळे एका तरुणीने भर मांडवातच स्वतःचे लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे.

ऐकावे ते नवलच!  थंडीमुळे भर मांडवात लग्न मोडलं, तरुण बेशुद्ध झाला; नववधू भडकली

Jharkhand Wedding News:  महाराष्ट्रासह देशभरातही थंडीचा कडाका वाढलेला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा 11 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पाहायला मिळाला. अलिकडे साताऱ्यातही 11 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. दिल्लीमध्ये सात डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले असून गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशामध्ये किमान तापमान 10 डिग्री अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. थोडक्यात काय तर थंडीमुळे भारतातील उत्तरेकडेची राज्ये गारठली असून याच थंडीमुळे एक लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोकळ्या मैदानात लग्नसोहळ्याचे आयोजन

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  झारखंडच्या देवघर शहरामध्ये एका विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देवघरच्या 'घोरमारा'चा रहिवासी असलेला अर्णव कुमार (28 वर्षे) याचे बिहारच्या भागरपूरची रहिवासी असलेल्या अंकिता  (25 वर्षे) हिच्याशी लग्न ठरले होते. हल्ली विवाह मंगल कार्यालयांऐवजी खुल्या मैदानात लग्नसोहळा आयोजित करणे अनेकांना आवडू लागले आहे. पण येथे हीच बाब लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरली. लग्नाच्या दिवशी म्हणजेच गेल्या शनिवारी (14 डिसेंबर) देवघर येथे किमान तापमान 8 डिग्री अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. अर्णव कुमारने लग्नासाठी उपवास केला होता. उपवास आणि थंडी यामुळे अर्णव कुमार मंडपात कोसळला. यामुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला होता. 

संसदेत राडा! भाजपचे 2 खासदार कोसळले; राहुल गांधींनी ढकलल्याचा आरोप

(नक्की वाचा: संसदेत राडा! भाजपचे 2 खासदार कोसळले; राहुल गांधींनी ढकलल्याचा आरोप)

अर्णव कुमार बेशुद्ध झाल्याचे कळताच अंकिताने हे लग्न आपण मोडत असल्याचे सांगितले आणि ती घरच्यांसह तेथून निघून गेली. जो तरुण थंडीचा सामना करू शकत नाही, थंडीमुळे बेशुद्ध पडतो. तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतो आणि त्याला आरोग्यविषयक समस्या असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही, असे अंकिताचे म्हणणंय. यामुळेच तिने हे लग्न मोडण्याचा तत्काळ निर्णय घेतला. 

फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

(नक्की वाचा:  फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत)

सप्तपदी सुरू होण्यापूर्वी तरुणाला भरली थरथरी

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसोहळा धुमधडाक्यात आयोजित करण्यात आला होता. वधु-वर पक्षाकडील मंडळी लग्नस्थळी पोहोचली होती. घोरमारातील एका खासगी गार्डनमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वर आणि नववधूने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि दोघे स्टेजवरच होते. गुरुजींनी सप्तपदीसाठीचे मंत्र म्हणायला सुरुवात केली असता अर्णव थरथरायला लागला आणि काही सेकंदातच तो बेशुद्ध पडला. अर्णवला शुद्धीवर आणण्यासाठी तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून अर्णवला शुद्धीवर आणेपर्यंत अंकिताने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता.

Mumbai Boat Accident | Gateway of India पासून बोटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी NDTV मराठीची बातचीत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com