जाहिरात

Haryana News: दुर्दैवी! मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Haryana News:  दुर्दैवी! मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य

हरियाणा: हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरियाणात एका 18 वर्षांच्या मुलीने मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केली. अन्नू असे तिचे असून आठ दिवसांपूर्वीच तिने वाढदिवस साजरा केला होता. अन्नूचा वाढदिवस 14 जुलै रोजी होता. त्या दिवशी ती 18 वर्षांची झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवला.

मृत अन्नूचे वडील सुरेंद्र मजूर म्हणून काम करतात. त्यांनी सांगितले की त्यांना चार मुले आहेत. अन्नू त्यांच्या चार मुलांपैकी सर्वात मोठी होता. ती 12 वी उत्तीर्ण झाली होती आणि तिने संगणक अभ्यासक्रमासोबत आयटीआयमध्ये प्रवेश घेतला होता. घटनेच्या दिवशी ते त्यांच्या धाकट्या मुलीला अपंगत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारी रुग्णालयात घेऊन गेले होते.

Big News: अल-कायदा मॉड्युलचा पर्दाफाश! ATS ने 4 दहशतवाद्यांना केली अटक

दुपारी साडेचार वाजता घरी परतल्यावर अन्नू माझ्यासाठी चहा बनवून वरच्या खोलीत गेली. काही वेळाने मी वर गेलो तेव्हा मला दिसले की खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता. तेव्हा संशय आला आणि आत गेल्यानंतर अन्नू तिच्या ओढणीच्या मदतीने पंख्याला लटकलेली आढळली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली.

वडिलांनी सांगितले की, अन्नूला बऱ्याच काळापासून मासिक पाळीशी संबंधित शारीरिक समस्या होत्या आणि तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु नियमित उपचार करूनही त्यात लक्षणीय सुधारणा झाली नाही. यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ लागली. या तणावामुळे तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलले. वडिलांच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

INDIA vs Pakistan : "पाकिस्तान कट्टरता आणि दहशतवादात बुडालेला आहे"; संयुक्त राष्ट्रात भारतानने सुनावले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com